Ind Vs Aus : अहमदाबाद कसोटी सामना पंतप्रधान मोदीही बघायला जाणार, कारण…
PM Narendra Modi visit 4th Test Match : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यातील चौथ्या आणि शेवटचा कसोटी सामन्याला येत्या 9 मार्चपासून सूरूवात होणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील हा सामना अहमदाबादला खेळवला जाणार आहे. या सामन्याला दोन्ही देशाचे पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि ऑस्ट्रेलियाचे एंथनी एल्बनीज (PM Anthony […]
ADVERTISEMENT

PM Narendra Modi visit 4th Test Match : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यातील चौथ्या आणि शेवटचा कसोटी सामन्याला येत्या 9 मार्चपासून सूरूवात होणार आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील हा सामना अहमदाबादला खेळवला जाणार आहे. या सामन्याला दोन्ही देशाचे पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आणि ऑस्ट्रेलियाचे एंथनी एल्बनीज (PM Anthony Albanese) हा सामना एकत्र पाहणार आहेत. त्यामुळे स्टेडिअमवर व्हिआयपी मुव्हमेंट पाहायला मिळणार आहे. या कारणामुळे स्टेडिअमचा काही हिस्सा पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या हेतूने प्रेक्षकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. आता पंतप्रधानांच्या उपस्थितीत पार पडणाऱ्या या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे. (ind vs aus 4th test pm modi and austalian pm anthony albanese watch test or border gavaskar trophy)
गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटकी अनिल पटेल यांनी स्पोर्टस तकला दिलेल्या माहितीनुसार, हा सामना दोन देशाचे प्रधानमंत्री पाहायला येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव काही सीट्स लॉक करण्यात येणार आहेत. त्यामुळे या सीट्स फॅन्ससाठी उपलब्ध नसणार आहेत. ज्यावेळेस सामना पाहण्यासाठी कोणताही प्रमुख पाहुणा येतो, त्यावेळेस असे केले जाते. तसेच तोच भाग राखीव केला जातो, ज्या भागात व्हिआयपी मुव्हमेंट असते. राखीव सोडून इतर सीट्सचे तिकीट फॅन्स खरेदी करू शकणार आहेत. तसेच या सामन्याचे तिकीट ऑनलाईन आणि ऑफलाईनही खरेदी करता येणार आहेत.
Ind Vs Aus: पराभवानंतर टीम इंडियात होणार बदल? ‘हा’ प्लेयर खेळण्याची शक्यता
अहमदाबाद टेस्ट निर्णायक
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाने (Team india) 2-1 ने मालिकेत आघाडी घेतलीय. आता शेवटचा अहमदाबादमध्ये रंगणारा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याच्या तयारीत असणार आहे. त्याबरोबरच सामना जिंकून टीम इंडियाची वर्ल्ड टे्स्ट चॅम्पियनशीपची (WTC) शर्यंतही अवघड करणार आहे. तर टीम इंडिया हा सामना जिंकून कसोटी मालिका खिशात घालण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. यासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची तिकीट कन्फर्म करणार आहे.