मोठी बातमी! नागपूरमधल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची जैश-ए-मोहम्मदने केली रेकी

मुंबई तक

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर नागपूरमधल्या संघ मुख्यालयाच्या इमारतीची जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. फक्त संघ मुख्यालयच नाही तर नागपूरमधल्या महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याचं समजतं आहे. संघ मुख्यालय, हेडगेवार भवन या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे. तसंच रेशीमबाग या ठिकाणी हेडगेवार भवनही आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

नागपूरमधल्या संघ मुख्यालयाच्या इमारतीची जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने रेकी केल्याची माहिती समोर आली आहे. फक्त संघ मुख्यालयच नाही तर नागपूरमधल्या महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याचं समजतं आहे. संघ मुख्यालय, हेडगेवार भवन या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरमध्ये आहे. तसंच रेशीमबाग या ठिकाणी हेडगेवार भवनही आहे. या दोन्ही ठिकाणांसह महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी जैश ए मोहम्मदने केल्याचं समजतं आहे. तसंच या ठिकाणांचे फोटोही घेतले गेले आहेत. ही माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी सुरक्षा वाढवली आहे. संघ मुख्यालय ही ती जागा आहे जिथे सरसंघचालक मोहन भागवत आणि संघाचे महत्त्वाचे पदाधिकारी असतात. जैश ए मोहम्मद या संघटनेने या दोन इमारतींसह इतरही काही भागांची रेकी केली आहे.

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. जैश ए मोहम्मदचे काही लोक या ठिकाणी रेकी करायला आले होते. त्यामुळे आम्ही शहरातील या दोन ठिकाणांसह इतर ठिकाणीही सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे असंही कुमार यांनी सांगितलं.

हे प्रकरण संवेदनशील असल्याने जास्त माहिती देण्यास पोलीस आयुक्तांनी नकार दिला आहे. मात्र पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संघ मुख्यालय तसंच हेडगेवार भवन आणि इतर काही महत्त्वाच्या जागांची रेकी एक महिन्यापूर्वी करण्यात आली. यासाठी दहशतवादी श्रीनगरहून आले होते असंही समजतं आहे. काही दिवस हे दहशतवादी नागपूरमध्ये थांबलो होते. या प्रकरणाची माहिती मिळताच एक पथक तयार करून त्यांचा शोध घेण्यास सुरूवात करण्यात आली. तसचं एक टीम श्रीनगरलाही गेली आहे. पोलीस सूत्रांनी ही माहितीही दिली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp