झेंडे अन् भोंगे… जोधपूरमध्ये का उडाला हिंसेचा भडका?, ईदच्या पूर्वसंध्येला काय घडलं?

मुंबई तक

राजस्थानातील जोधपूर शहरात ईदच्या पूर्वसंध्येला दोन समुदायामध्ये हिंसक झडप झाली. पोलिसांनी आणि प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून समाजकंटकांना पांगवले आणि शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. रात्रभर शांतता होती, पण पहाट झाली आणि पुन्हा उद्रेक झाला. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले असून, अशोक गेहलोतांनी आपातकालीन बैठकही घेतली. त्यानंतर आता यावरून राजकारण तापलं आहे. जोधपूरमधील हिंसेची सुरूवात झाली […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

राजस्थानातील जोधपूर शहरात ईदच्या पूर्वसंध्येला दोन समुदायामध्ये हिंसक झडप झाली. पोलिसांनी आणि प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून समाजकंटकांना पांगवले आणि शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. रात्रभर शांतता होती, पण पहाट झाली आणि पुन्हा उद्रेक झाला. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले असून, अशोक गेहलोतांनी आपातकालीन बैठकही घेतली. त्यानंतर आता यावरून राजकारण तापलं आहे.

जोधपूरमधील हिंसेची सुरूवात झाली शहरातील जलोरी गेटपासून… येथे स्वातंत्र्यसेनानी बालमुकुंद बिस्सा चौक आहे. दोन दिवसांपूर्वी या चौकात परशुराम जयंतीच्या निमित्ताने भगवे झेंडे आणि बॅनर लावण्यात आले होते. याचदरम्यान ईदच्या पूर्वसंध्येला या चौकात चौहीबाजूने भोंगे लावले आणि मूर्तीलाच एक मोठा धार्मिक ध्वज लावला. आधीचे झेंडे काढून टाकण्यात आले.

भगवे झेंडे काढून टाकल्याची बातमी पसरताच दुसऱ्या गटाचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि चौकात चारही बाजूंनी लावलेले भोंगे हटवू लागले. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावरून वेगाने पसरले. त्यानंतर त्यानंतर दुसऱ्या गटाचे लोकही मोठ्या संख्येनं आले आणि वादाला सुरूवात झाली. वाद शिगेला पोहोचला आणि त्याच पर्यवसान दगडफेक आणि तोडफोडीत झालं.

हे वाचलं का?

    follow whatsapp