सचिन वाझे हिरेनला ओळखतात हे आम्हाला माहिती नव्हतं !
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांची अखेरीस गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बदली केली आहे. मंगळवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांचा संबंध जोडत वाझे यांचं निलंबन करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हिरेन यांची कार ही ४ महिने सचिन वाझे यांच्याकडे होती. परंतू सचिन वाझे […]
ADVERTISEMENT

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांची अखेरीस गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बदली केली आहे. मंगळवारी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांचा संबंध जोडत वाझे यांचं निलंबन करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. हिरेन यांची कार ही ४ महिने सचिन वाझे यांच्याकडे होती. परंतू सचिन वाझे मनसुख हिरेनला ओळखत असल्याची कल्पना क्राईम ब्रांचला नव्हती असं समोर आलंय. मुंबईचे सह पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलींद भारंबे यांनी पत्रकारांशी बोलत असताना माहिती दिली.
देवेंद्र फडणवीसांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात हक्कभंग
“सचिन वाझे मनसुख हिरेनला ओळखत होते याबद्दल क्राईम ब्रांचला कल्पना नव्हती. वाझेंनी आम्हाला याबद्दल कधीच सांगितलं नाही. वाझे हिरेन यांची कार वापरत होते याबद्दलही आम्हाला कल्पना नव्हती. हिरेन यांच्या मृत्यूचं प्रकरण बाहेर आल्यानंतर वाझे आणि त्यांच्या ओळखीमुळे या केसचा प्रभाव वाढला. याच कारणासाठी त्यांची बदली करण्यात आली आहे.”
फडणवीसांनी केलेल्या आरोपांवर सचिन वाझे म्हणतात…