Kangna ला हायकोर्टाचा दणका, पासपोर्ट नुतनीकरण प्रकरणी तातडीचा दिलासा नाही
अभिनेत्री कंगनाला हायकोर्टाने पासपोर्ट नुतनीकरण प्रकरणात कोणताही दिलासा दिलेला नाही. तातडीचा दिलासा देण्यास बॉम्बे हायकोर्टाने नकार दिला आहे. पासपोर्टची मुदत संपत असताना ऐनवेळी याचिका का दाखल केली? असा सवाल करून सिनेमाच्या चित्रीकरणाच्या तारखा बदलता येतात असंही हायकोर्टाने नमूद केलं आहे. कंगनाच्या याचिकेवर आता पुढची सुनावणी 25 जूनला होणार आहे. पासपोर्ट रिन्यू करण्याप्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री कंगनाला हायकोर्टाने पासपोर्ट नुतनीकरण प्रकरणात कोणताही दिलासा दिलेला नाही. तातडीचा दिलासा देण्यास बॉम्बे हायकोर्टाने नकार दिला आहे. पासपोर्टची मुदत संपत असताना ऐनवेळी याचिका का दाखल केली? असा सवाल करून सिनेमाच्या चित्रीकरणाच्या तारखा बदलता येतात असंही हायकोर्टाने नमूद केलं आहे. कंगनाच्या याचिकेवर आता पुढची सुनावणी 25 जूनला होणार आहे. पासपोर्ट रिन्यू करण्याप्रकरणी हायकोर्टात सुनावणी झाली त्यावेळी कंगनावर देशद्रोह प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच मुद्दा उपस्थित करून पासपोर्ट प्राधिकरणाने कंगनाचा पासपोर्ट रिन्यू करण्यावर हरकत घेतली आहे. यामुळेच कंगनाने पासपोर्ट रिन्यू करून मिळावा म्हणून हायकोर्टात धाव घेतली आहे. या प्रकरणी आता तूर्तास तरी कंगनाला दिलासा मिळालेला नाही. आता याप्रकरणी पुढील सुनावणी 25 जूनला होणार आहे.
काय म्हटलं होतं कंगनाने याचिकेत?
मला एका सिनेमात मध्यवर्ती भूमिका मिळाली आहे या सिनेमाच्या शुटिंगसाठी मला बुडापेस्ट हंगेरी या ठिकाणी जायचं आहे मात्र पासपोर्ट कार्यालयातील अधिकारी माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे पासपोर्टचं नुतनीकरण करण्यास नकार देत आहेत. ते नुतनीकरण मला करून मिळावं असंही कंगनाने म्हटलं. कंगनाच्या ‘धाकड’ सिनेमाच्या दुसऱ्या शेड्यूलचं शूटिंग बाकी आहे. यासाठी प्रवास करणं महत्वाचं असल्याचं या याचिकेत म्हंटलं आहे. तसंच कंगनाने आधीच शूटिंगसाठी कमिटमेंट केल्या आहेत. विदेशात प्रॉडक्शन हाऊसकडूनही सर्व तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे कंगनाचं तिथे पोहचणं महत्वाचं आहे असं म्हणतं पासपोर्ट रिन्यू करण्यात यावं अशी विनंती या याचिकेत करण्यात आली होती. मात्र या याचिकेबाबत कंगनाला कोणताही दिलासा तातडीने देण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.