दार तोडून इम्रान खानच्या घरात घुसले लाहोर पोलीस; बुलडोजरने...

इम्रानच्या लाहोरमधील घराबाहेरील वातावरण खूपच बिघडले आहे. इम्रानच्या जमान पार्क येथील घराच्या टेरेसवरून पोलिसांवर गोळीबार करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
Imran Khan च्या जमान पार्क येथील घराच्या टेरेसवरून पोलिसांवर गोळीबार
Imran Khan च्या जमान पार्क येथील घराच्या टेरेसवरून पोलिसांवर गोळीबारImran Khan House

Imran khan Toshkhana : तोषखाना प्रकरणातील आरोपी आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर पुन्हा संकटाचे ढग दाटून आले आहेत. ते आज (Islamabad) इस्लामाबाद न्यायालयात हजर होणार होते, मात्र न्यायालयात जाण्यापूर्वी त्यांच्या ताफ्याला इस्लामाबाद टोल प्लाझा येथे थांबवण्यात आले. दुसरीकडे, इम्रान खान इस्लामाबादला रवाना झाले तेव्हा पोलीस त्यांच्या लाहोरमधील (Lahore) घरी पोहोचले. यावेळी पोलीस आणि पीटीआय (PTI Workers) कार्यकर्त्यांमध्ये झटापटही झाली. (Lahore Police entered Imran Khan's house by breaking the door)

इस्लामाबादला जात असताना इम्रान खान यांनी एक व्हिडिओही जारी केला. या व्हिडिओमध्ये इम्रान खान म्हणत आहेत की, मी इस्लामाबादला पोहोचल्यावर मला अटक करतील. माझी अटक हा 'लंडन प्लॅन'चा एक भाग असल्याचे इम्रानने म्हटले आहे. माझी अटक नवाझ शरीफ यांच्या सांगण्यावरून होत आहे, असं देखील ते म्हणाले.

इम्रान खान म्हणाले, मी यापूर्वीही इस्लामाबाद कोर्टात हजर होणार होतो. पंजाब पोलिसांनी जमान पार्कमधील माझ्या घरावर हल्ला केला, जिथे बुशरा बेगम एकटी होती. ते कोणत्या कायद्यानुसार हे करत आहेत? हा लंडन योजनेचा भाग आहे, असं ते म्हणाले. इम्रानच्या लाहोरमधील घराबाहेरील वातावरण खूपच बिघडले आहे. इम्रानच्या जमान पार्क येथील घराच्या टेरेसवरून पोलिसांवर गोळीबार करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी तेथे उपस्थित असलेल्या पीटीआय कार्यकर्त्यांना लाठीमार केला.

पोलीस दरवाजा तोडून आत

पीटीआय कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचाही वापर केला. पोलिसांच्या या कारवाईत इम्रानच्या घराचा दरवाजा तोडण्यासाठी बुलडोझरचाही वापर करण्यात आला होता.

Imran Khan च्या जमान पार्क येथील घराच्या टेरेसवरून पोलिसांवर गोळीबार
इम्रान खान यांना सत्तेतून खाली खेचणारे शाहबाज शरीफ कोण आहेत?

सुनावणीसाठी जात असताना अपघात झाला

विशेष म्हणजे आज सुनावणीसाठी जात असताना पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ताफ्याला अपघात झाला. इम्रान खान यांच्या ताफ्यातील वाहने एकमेकांवर आदळली. अपघातानंतरचा व्हिडिओ पाहता ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळल्याचे स्पष्टपणे समजते, त्यापैकी एक वाहन पूर्णपणे उलटले.माजी पंतप्रधान इम्रान खान तोशाखाना प्रकरणात हजर राहण्यासाठी लाहोरहून इस्लामाबादला जात असताना ही घटना घडली. मात्र, माजी पंतप्रधान इम्रान खान हे अपघातात सामील असलेल्या दोन्ही वाहनांपैकी एकाही गाडीत नव्हते.

Imran Khan च्या जमान पार्क येथील घराच्या टेरेसवरून पोलिसांवर गोळीबार
पाकिस्तानमध्ये खळबळ! माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर झाडल्या गोळ्या

काय आहे तोषखाना प्रकरण?

विशेष म्हणजे तोशाखाना प्रकरणामुळे इम्रान खान सध्या अडचणीत सापडले आहेत. इम्रान खान यांच्यावर भेटवस्तूंमध्ये हेराफेरी केल्याचा आरोप आहे. 2018 मध्ये, देशाचे पंतप्रधान म्हणून, त्यांना त्यांच्या युरोप आणि विशेषतः अरब देशांच्या दौऱ्यात अनेक मौल्यवान भेटवस्तू मिळाल्या होत्या. कथितरित्या, इम्रानने अनेक भेटवस्तू घोषित केल्या नाहीत, तर अनेक भेटवस्तू मूळपेक्षा खूपच कमी किमतीत खरेदी केल्या गेल्या आणि जादा दराने विकल्या गेल्या, असा त्यांच्यावर आरोप आहे.

Imran Khan च्या जमान पार्क येथील घराच्या टेरेसवरून पोलिसांवर गोळीबार
Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट, तोषखाना प्रकरण काय?

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in