कशी आहे लता मंगेशकरांची तब्येत? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती

मुंबई तक

कोरोनाची लागण झाल्यापासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लता मंगेशकर यांच्या तब्येतीत आता सुधारणा झाली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना याबद्दल माहिती दिली. लता मंगेशकर यांच्या तब्येतील आता बरीच सुधारणा झाली आहे. त्यांना व्हेंटीलेटरवरुनही काढण्यात आलं आहे. परंतू खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्यावर अजुनही ICU मध्ये उपचार सुरु आहेत. लता […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोनाची लागण झाल्यापासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लता मंगेशकर यांच्या तब्येतीत आता सुधारणा झाली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पंढरपुरात पत्रकारांशी बोलताना याबद्दल माहिती दिली.

लता मंगेशकर यांच्या तब्येतील आता बरीच सुधारणा झाली आहे. त्यांना व्हेंटीलेटरवरुनही काढण्यात आलं आहे. परंतू खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्यावर अजुनही ICU मध्ये उपचार सुरु आहेत. लता मंगेशकरांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आपण विठ्ठलाकडे प्रार्थना केल्याचंही राजेश टोपेंनी सांगितलं.

८ जानेवारीला लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. ज्यानंतर त्यांच्यावर मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात डॉ. प्रतीत समदानी यांची टीम उपचार करत आहे.

२०१९ मध्ये २८ दिवस रूग्णालयात होत्या लतादीदी –

२०१९ मध्येही लतादीदींना निमोनिया झाला होता. त्यावेळी त्यांना एक-दोन नाही तर तब्बल २८ दिवस रूग्णालयात रहावं लागलं होतं. त्यांची प्रकृती पूर्ण बरी झाल्यानंतरच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. आता यावेळी लता मंगेशकर यांना कोरोना आणि निमोनिया झाल्याने त्यांना ब्रीचकँडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp