महाराष्ट्रात ‘या’ चार टप्प्यात लॉकडाऊन शिथिल होईल

मुंबई तक

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता राज्य सरकारने 30 जूनपर्यंत 4 टप्प्यात लॉकडाऊन शिथिल करण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या फ्रंटवर यासाठीच्या नियोजनाला सुरूवात झालीय, अशी माहिती समोर येतीय. लॉकडाऊन पूर्णपणे कधी संपेल याबाबत तर इतक्यात स्पष्टता मिळणं शक्य नाही. कारण राज्यात तिसऱ्या लाटेबद्दलच भाकित करण्यात आलं आहे. त्याचा प्रभाव कमी करता येऊ शकतो पण, पूर्णपणे ती […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता राज्य सरकारने 30 जूनपर्यंत 4 टप्प्यात लॉकडाऊन शिथिल करण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या फ्रंटवर यासाठीच्या नियोजनाला सुरूवात झालीय, अशी माहिती समोर येतीय. लॉकडाऊन पूर्णपणे कधी संपेल याबाबत तर इतक्यात स्पष्टता मिळणं शक्य नाही. कारण राज्यात तिसऱ्या लाटेबद्दलच भाकित करण्यात आलं आहे. त्याचा प्रभाव कमी करता येऊ शकतो पण, पूर्णपणे ती टाळता येणार नाही असं तज्ञांनी स्पष्ट केलंय त्यामुळे पूर्ण लॉकडाऊन संपणार नाही, पण त्यातून सूट नक्कीच मिळेल.

आता या अनलॉकचे 4 टप्पे असण्याची शक्यता आहे, तर हे 4 टप्पे कोणते ते सर्वप्रथम जाणून घेऊया

पहिला टप्पा

दुकानांची वेळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत वाढवण्याची शक्यता

दुसरा टप्पा

लोकांच्या दररोजच्या जीवनाशी निगडीत आणखी काही दुकानं उघडण्याची परवानगी

ही दुकानं काही कालावधीसाठी उघडण्यास परवानगी

एकाड एक दिवस दुकानं उघडण्याची शक्यता

तिसरा टप्पा

हॉटेल, परमिट रुम, बिअरबार, मद्यविक्री दुकानं निर्बंधांसह सुरू

हॉटेल पूर्ण क्षमतेनं नाही, 50 टक्के क्षमतेनं सुरू होण्याची शक्यता

चौथा टप्पा

मुंबई लोकल, मंदिरासह धार्मिक स्थळं, जिल्हाबंदी स्थगित

पण असं असलं तरी ऑगस्ट-सप्टेंबरच्या काळात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसरी लाट मोठी असेल, अपेक्षित लसीकरण तोपर्यंत झालं नसेल, रुग्णसंख्येत परत वाढ होतेय असं दिसलं तर आपण पुन्हा लॉकडाऊनच्या जवळ जाऊ का हा प्रश्न आहेच. त्यामुळे लॉकडाऊन पूर्णपणे संपणार नाही हे नक्की. त्याबद्दल राजेश टोपे यांनी महत्त्वाचं विधान केलंय.

राजेश टोपे लॉकडूनबद्दल काय म्हणाले?

तयारीचा आढावा घेऊ. सर्व बाबी सकारात्मक असतील तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, टास्क फोर्सच्या तज्ञांशी सल्लामसलत करूनच नंतर निर्बंध काही अंशी शिथिलतेबाबत निर्णय घेऊ शकेल. पूर्णपणे निर्बंध हटवले जातील या भ्रमात राहू नका

लॉकडाऊनचा निर्णय घेताना सरकार 3 महत्त्वाच्या निकषांचा वापर करेल. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि टास्क फोर्सबरोबर त्याबाबत चर्चा करेल. मगच निर्णय घेतला जाईल.

‘या’ निकषांच्या आधारे लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल

1) कोरोनाचा पॉझिटिव्ही रेट सिंगल डिजिटमध्ये येणं

2) आयसीयू ऑक्सिजनची उपलब्धता 60 टक्क्यांपेक्षा जास्त राहणं

3) राज्याचा कोरोना मृत्यू दर

त्यामुळे या निकषांच्या आधारावर सरकार नेमका कोणता निर्णय घेतंय हे येत्या काळात स्पष्ट होईल.

हे वाचलं का?

    follow whatsapp