Maharashtra Bandh: मुंबईत ‘महाराष्ट्र बंद’ला गालबोट, 8 ठिकाणी फोडल्या BEST बस
मुंबई: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence)घटनेच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आज (11 ऑक्टोबर) महाराष्ट्रात बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे. सत्तेत असलेल्या शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तिन्ही पक्षांनी हा बंद पुकारला आहे. महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष संयुक्तपणे निषेध नोंदवून आंदोलन करत आहेत. या […]
ADVERTISEMENT

मुंबई: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) लखीमपूर खेरी हिंसाचार (Lakhimpur Kheri Violence)घटनेच्या निषेधार्थ आणि शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी आज (11 ऑक्टोबर) महाराष्ट्रात बंदची (Maharashtra Bandh) हाक देण्यात आली आहे. सत्तेत असलेल्या शिवसेना (Shiv Sena), राष्ट्रवादी (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तिन्ही पक्षांनी हा बंद पुकारला आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष संयुक्तपणे निषेध नोंदवून आंदोलन करत आहेत. या सगळ्या दरम्यान, महाराष्ट्रात बंदचा परिणाम स्पष्टपणे दिसू लागलेला आहे. तसेच, मुंबईच्या विविध भागात आतापर्यंत आठ बेस्ट (BEST)बसेसची तोडफोड करण्यात आल्याची माहिती बेस्टकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र बंद आंदोलनातील आतापर्यंतची चांगली बातमी म्हणजे मुंबईतील लोकल ट्रेन आणि इतर रेल्वे याच्यावर या बंदचा काहीही परिणाम झालेला नाही. रेल्वेच्या सर्व सेवा त्यांच्या नियमित वेळापत्रकानुसार सुरु आहेत.
पण मुंबईतील बेस्ट बसवर मात्र बंदचा परिणाम दिसून येत आहे. बेस्टवर शिवसेना युनियनचे वर्चस्व आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंदचा त्यावर स्पष्ट परिणाम दिसून येत आहे. पण यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या अडचणी वाढल्या आहेत. आज मुंबईत फारच तुरळक बेस्ट बस या रस्त्यावर धावताना दिसल्या. त्यातही जवळजवळ 8 बसेसचे तोडफोड करण्यात आल्याने बरंच नुकसान झालं आहे.