Maharashtra Bandh Live Updates: महाविकास आघाडीचं 'महाराष्ट्र बंद' आंदोलन कसं आहे सुरु?

Maharashtra Bandh Live Updates: लखीमपूर येथील शेतकरी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बंद पुकारला आहे. जाणून घ्या महाराष्ट्रात या बंदला नेमका कसा प्रतिसाद मिळतो आहे.
Maharashtra Bandh Live Updates: 
महाविकास आघाडीचं 'महाराष्ट्र बंद' आंदोलन कसं आहे सुरु?
maharashtra bandh live updates lakhimpur kheri violence farmers bjp govt protest shivsena ncp congress

मुंबई: उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील तिन्ही घटकपक्षांनी बंदची हाक दिली आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी आज (11 ऑक्टोबर) बंदची हाक दिलेली आहे. दरम्यान, या बंदला महाराष्ट्रात नेमका कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्यात यावं असं आवाहन तीनही पक्षाने केलं आहे. राज्यात सध्या हा बंद सरकारकडून पुकारण्यात आलेला नसून पक्षीय पातळीवर असल्याचे तीनही पक्षाने आधीच स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्र बंद आंदोलन: LIVE UPDATE

 • मुंबई: महाराष्ट्र बंदचा आता हळूहळू परिणाम जाणवू लागला आहे. या बंदमध्ये मुंबईतील बेस्ट बसच्या संघटना देखील सहभागी झाल्या आहेत. पण यामुळे मुंबईकरांचे बरेच हाल होत आहेत.

 • शिवसैनिकांनी विक्रोळी ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर टायर जाळून केला रस्ता जाम, वाहतुकीचा प्रचंड खोळंबा

 • मुंबईतील कांदिवलीच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दररोज प्रचंड ट्रॅफिक जाम असतं. पण आज बंदचा परिणाम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. कारण आज इथे अजिबात ट्रॅफिक जाम पाहायला मिळत नाही.

 • महाराष्ट्रात बंदमध्ये मुंबईतील व्यापारी देखील सहभागी होणार आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत दुकानं बंद ठेवणार असल्याचं मुंबई व्यापारी संघाचे अध्यक्ष विरेन शहा यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

 • बुलडाणा: बुलडाणा जिल्ह्यात सकाळपासून कडकडीत बंद असून जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या वरवट बकाल येथे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बाजारपेठ बंद ठेवण्याचं आवाहन करीत असताना भाजप कार्यकर्ता असलेल्या एका दुकानदाराने आपलं दुकान बंद करण्यास विरोध दर्शविल्याने महाविकास आघाडीतील कार्यक्रर्ते आक्रमक झाले, त्यांनी बळजबरीने दुकान बंद केलं व दुकानदाराला आत कोंडून ठेवलं.

 • ठाणे: महाराष्ट्र बंदला जय हिंद पार्टीचा पाठिंबा, मुंबईहून ठाण्याच्या दिशेने येणारा महामार्ग जयहिंद पार्टीचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी धरला रोखून, ठाणे पोलिसांनी घेतलं भोसले यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताब्यात

 • शिवसेना-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर, ठाणे बाजारपेठेतील सुरु असलेली दुकान बंद करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार व ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे बंद करण्यासाठी एकत्र रस्त्यावर, दंगल नियंत्रण पथक आणि मोठा पोलीस बंदोबस्त.

 • कल्याण-डोंबिवली: महाराष्ट्र बंद आंदोलनाचे पडसाद आता डोंबिवलीत देखील पहायला मिळत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांसह इतरही अनेक संघटनाच्या कार्यकर्त्यांनी डोंबिवलीत निदर्शने सुरु केली आहेत. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी पोलिसांनकडून आंदोलन कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं आहे.

maharashtra bandh live updates lakhimpur kheri violence farmers bjp govt protest shivsena ncp congress
Maharashtra Bandh : आज 'महाराष्ट्र बंद'! काय सुरु आणि काय असणार बंद?
नवी मुंबईतील APMC मार्केट पूर्णपणे बंद
नवी मुंबईतील APMC मार्केट पूर्णपणे बंद
 • पालघर: बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, पालघर शहरात कडकडीत बंद, बाजार पेठ, भाजी मार्केट, मासळी मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती ही पूर्णपणे बंद आहे. यावेळी रिक्षा, एसटी बस सेवा देखील बंद आहे.

 • बारामती: शहरातल्या सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून महाराष्ट्र बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतल्या सर्व व्यापाऱ्यांनी या बंदमध्ये शंभर टक्के प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले होते. या आवाहनाला व्यापाऱ्याने देखील प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळते.

 • कोल्हापूर: लखीमपूर येथील घटनेत आंदोलक शेतकर्‍यांची हत्या करण्यात आली त्याच्या निषेधार्थ भाजप सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करत शिवसेना कार्यकर्त्यांनी कोल्हापूर येथील NH-4 पुणे-बंगळुरु हायवेवर चक्का जाम आंदोलन केलं असून यावेळी वाहतूक रोखून धरली आहे.

 • सोलापूर: सोलापूरमध्ये महाराष्ट्र बंदला पाठिंबा नसल्याचे चित्र सध्या दिसतं आहे. कारण सोलापुरातील मार्केट यार्ड परिसरामध्ये सर्व बाजार सध्या सुरळीत असून मार्केटमध्ये नेहमीप्रमाणे आजही गर्दी दिसून येत आहे. दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सोलापूरमध्ये येऊन या बंदला पाठिंबा द्यावा असे आवाहन केले होते. मात्र तरी देखील अद्याप तरी सोलापूरमधील व्यवहार सुरळीत चालले असल्याचं दिसून येत आहे.

 • नवी मुंबई: नवी मुंबईतील एपीएमसी यार्ड देखील आज पूर्णपणे बंद असून येथील व्यापारी वर्गाने या महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला आहे.

सातारा: आज सातारा शहर व कराडमध्ये दुपारी 2 च्या सुमारास महाविकास आघाडीच्या वतीने राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये सामील झाले होते. सातारा शहरात या बंदला संमिश्र असा प्रतिसाद मिळत असल्यामुळे मोर्चातील अनेक जणांनी सुरू असलेली दुकाने बंद केली.

धुळे: आज राज्य सरकारमध्ये सामील असलेल्या तीनही घटक पक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या दरम्यान घटनेचा निषेध करण्यासाठी धुळे शहरालगत असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव चौफुली याठिकाणी आंदोलकांतर्फे रास्ता रोको करण्यात आला.

गडचिरोली: गडचिरोली शहरात मुख्य रस्त्यावरील काही दुकाने बंद असून मुख्य बाजारपेठ सुरू होती. मात्र, जिल्ह्यातील काही तालुक्यात बंदला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

बीड: बीड,अंबाजोगाई, केज, परळी यासह आदी शहरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. बीड जिल्ह्यात सर्व पक्ष्याच्या वतीने भाजपला सरकारबाबत निषेध व्यक्त करण्यात आला असून जोरदार घोषणा देखील देण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.