Live : इतकं नाकाला झोंबत असेल, तर…; अजित पवारांचे शिंदेंना खडेबोल

मुंबई तक

Maharashtra Budget Session Live : 16 आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेतील संघर्षांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असतानाच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये राजकीय वार-प्रतिवार सुरू झाले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत गटनेता नियुक्तीबद्दलचं पत्र उपसभापतींना दिल्यानंतर ठाकरेंनीही आपली चाल चालली आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष अधिवेशनात तापण्याची चिन्ह दिसत आहेत. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Maharashtra Budget Session Live : 16 आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेतील संघर्षांचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात असतानाच विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये राजकीय वार-प्रतिवार सुरू झाले आहेत. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत गटनेता नियुक्तीबद्दलचं पत्र उपसभापतींना दिल्यानंतर ठाकरेंनीही आपली चाल चालली आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे संघर्ष अधिवेशनात तापण्याची चिन्ह दिसत आहेत.

मी बोलताना स्पष्ट बोलतो हे तुम्हाला माहितीये, तिथे म्हणताना त्यांनी (एकनाथ शिंदे) सांगायला पाहिजे होतं की, एमपीएससीला आम्ही कळवतो. ते तीनदा-चारदा म्हणाले की, निवडणूक आयोगाला कळवतो. मी सांगितलं की, राज्याचे मुख्यमंत्री निवडणूक आयोग… निवडणूक आयोग करताहेत. त्याचाही राग आला. असं कसं? आता जे चुकलं ते मी मांडणारच ना? माझं विरोधी पक्ष म्हणून काम नाहीये का? तुम्हाला एव्हढं नाकाला झोंबत असेल, तर मग एमपीएससी म्हणावं निवडणूक आयोग म्हणू नये. साधं सरळ गणित आहे. यात वाईट वाटण्यासारखं काय आहे?”, अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र डागलं.

अजित पवारांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

राज्यपाल अभिभाषणाच्या अभिनंदन प्रस्ताववर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला खडेबोल सुनावले. सरकारने स्वतःची पाठ थोपटवून घेऊ नये, राज्यपालांनी मराठी भाषण करायला हवं होतं, असंही अजित पवार म्हणाले.

अजित पवार म्हणाले, हे असे लोक कुणाचेच नसतात; फडणवीस म्हणाले,….

शशिकांत वारिशे हत्या प्रकरणावर बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, “महाराष्ट्राला काळीमा लावणारी घटना घडली. पत्रकारांकडे चौथा स्तंभ म्हणून आपण बघतो. कायदा सुव्यवस्था बिघडणार नसेल, तर कुणाला वाईट वाटण्याचं कारण नाही. माझा प्रश्न आहे की, शशिकांत वारिशेंच्या कुटुबीयांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात आलीये का? काही जाहीर केलेलं आहे का? रत्नागिरी जिल्ह्यात रिफायनरीचे समर्थक आणि विरोधक असा वाद सुरू आहे, अशी शंका येते. आपण पोलीस खात्याचे प्रमुख म्हणून तुमचं काय म्हणणं आहे आणि रिफायनरी संदर्भात तुमची भूमिका काय आहे?”

पंढरीनाथ आंबेरकरने दिलेल्या जाहिराती अजित पवारांनी सभागृहात दाखवल्या. त्यानंतर ते म्हणाले, “ज्याने नीच कृत्य केलं. मी पण सरकारमध्ये काम केलं आहे. तुमच्या वरिष्ठांचे फोटो त्याने लावले आहेत. तुम्ही तपासू एसआयटी लावली आहे, त्यावर अजिबात दबाव येऊ देऊ नका. अशी लोकं कुणाचीच नसतात. आमचं सरकार असतं, तर आमचा उदो उदो केला असता. त्याकरिता स्पष्ट सूचना द्याव्या लागतील. असे फोटो लावल्यामुळे शंका उपस्थित होतो. त्यामुळे तपास पारदर्शकपणे झाला पाहिजे. मास्टरमाईंड कोण आहे? ते बघितलं तर त्याने जाणीवपूर्वक केल्याचं दिसतंय.”

हे वाचलं का?

    follow whatsapp