
एकीकडे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोना रुग्णसंख्या घट असतानाच राज्यातील इतर भागात मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. राज्यात १८ आणि १९ जानेवारी रोजी आढळून आलेल्या रुग्णसंख्येच्या तुलनेत राज्यात कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. राज्यात आज ४६ हजार १९७ कोरोना बाधित आढळून आले आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात ५२ हजार २५ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत ६९,६७,४३२ नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट ९४.५२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
दरम्यान, राज्यात आज ३७ कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर सध्या १.९२ टक्के इतका आहे. राज्यात आजपर्यंत ७,२७,४५,३४८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी ७३,७१,७५७ (१०.१३ टक्के) नमुने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या राज्यात २४,२१,५०१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर ३,३९१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
सलग दुसऱ्या दिवशी आढळले शंभराहून अधिक ओमिक्रॉन बाधित
राज्यात बुधवार (१९ जानेवारी) पाठोपाठ आजही (२० जानेवारी) शंभरपेक्षा अधिक ओमिक्रॉन व्हेरियंट बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ८७ रुग्ण भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन परिषदेनं केलेल्या चाचणी निरीक्षणात, तर ३७ रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळेनं नोंदवले आहेत.
कोणत्या जिल्ह्यात किती ओमिक्रॉन रुग्ण?
मुंबई -687
पुणे मनपा -865
पिंपरी चिंचवड -118
नागपूर -116
सांगली -59
ठाणे मनपा -50
पुणे ग्रामीण - 56
मीरा भाईंदर -52
कोल्हापूर -19
पनवेल -18
अमरावती -25
सातारा -14
नवी मुंबई -13
उस्मानाबाद, अकोला -प्रत्येकी 11
कल्याण डोंबिवली -11
बुलढाणा -6
वसई विरार -7
भिवंडी निजामपूर मनपा -5
औरंगाबाद -20
अहमदनगर आणि नाशिक - प्रत्येकी 4
नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया, आणि लातूर -प्रत्येकी - 3
गडचिरोली, नंदुरबार, सोलापूर आणि परभणी - प्रत्येकी 2
रायगड, वर्धा भंडारा आणि जळगाव -प्रत्येकी 1
इतर राज्य -1
राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची एकूण संख्या -2,199