Mumbai: मुंबईतील शिवसेना आमदाराला सेक्स चॅट केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न
एजाज खान, मुंबई मुंबईतील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला थेट राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या क्राइम ब्रांचच्या टीमने रविवारी रात्री भरतपूरच्या सीकरी येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपीला मुंबईत आणण्यात आले असून सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे. सेक्सटॉर्शन प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न झालेल्या शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर […]
ADVERTISEMENT

एजाज खान, मुंबई
मुंबईतील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला थेट राजस्थानमधून अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या क्राइम ब्रांचच्या टीमने रविवारी रात्री भरतपूरच्या सीकरी येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, आरोपीला मुंबईत आणण्यात आले असून सध्या त्याची कसून चौकशी केली जात आहे. सेक्सटॉर्शन प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न झालेल्या शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी तात्काळ पोलीस तक्रार नोंदवल्याने आरोपीला अटक करण्यात क्राइम ब्रँचच्या टीमला यश आलं आहे.
शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांना सेक्सटॉर्शनमध्ये अडकविण्यासाठी कसा रचला कट?
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांनी 20 ऑक्टोबर रोजी रात्री एक मेसेज आला. हा मेसेज मौसमदीन नावाच्या एका व्यक्तीने केला होता. चॅटिंगमध्ये आपण महिला असल्याचं भासवून त्याने आमदार कुडाळकर यांच्याकडे मदत मागितली. आमदार कुडाळकर देखील मदतीसाठी तयार झाले. त्यानंतर थोड्याच वेळाने आमदार कुडाळकरांच्या मोबाइलवर एका महिलेचा व्हीडिओ कॉल आला.