अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचं पॅकेज; मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा

मुंबई तक

यंदा जून ते ऑक्टोबर महिन्यात राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीबरोबरच आपत्तीही ओढवलेल्या अतिवृष्टी आणि पूराचा फटका बसलेल्यांना मदत देण्याचा निर्णय अखेर राज्य सरकार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाची घोषणा केली. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

यंदा जून ते ऑक्टोबर महिन्यात राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी पूरपरिस्थितीबरोबरच आपत्तीही ओढवलेल्या अतिवृष्टी आणि पूराचा फटका बसलेल्यांना मदत देण्याचा निर्णय अखेर राज्य सरकार आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाची घोषणा केली.

राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी, त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झालं आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’च्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज राज्य सरकारने घेतला आहे.

मदतीचे निकष खालीलप्रमाणमे आहेत…

जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर

हे वाचलं का?

    follow whatsapp