Supreme Court Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाची सुनावणी गुरूवारी! कोर्टात काय काय घडलं?

मुंबई तक

ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट ही लढाई सुप्रीम कोर्टात सुरू आहे. या प्रकरणातली आजची सुनावणी संपली आहे. आता गुरूवारी पुढील सुनावणी पार पडणार आहे. अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली त्यांच्या बाजूने युक्तिवाद केला. तर हरिष साळवे यांनी शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद केला. सुनावणी सुरू झाल्यापासून कोर्टात काय काय घडलं […]

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट ही लढाई सुप्रीम कोर्टात सुरू आहे. या प्रकरणातली आजची सुनावणी संपली आहे. आता गुरूवारी पुढील सुनावणी पार पडणार आहे. अभिषेक मनु सिंघवी आणि कपिल सिब्बल यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली त्यांच्या बाजूने युक्तिवाद केला. तर हरिष साळवे यांनी शिंदे गटाच्या बाजूने युक्तिवाद केला. सुनावणी सुरू झाल्यापासून कोर्टात काय काय घडलं आपण जाणून घेऊ.

सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

मागच्या सरकारने म्हणजेच महाविकास आघाडीने एक वर्षाहून अधिक काळ विधानसभेचा अध्यक्ष निवडला नाही. नवीन सरकारने अध्यक्ष निवडणं आवश्यक होतं ही महत्त्वाची बाब राज्यघटनेत नमूद आहे. मुख्यमंत्रीपदी बसलेल्या उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतरच नवं सरकार स्थापन झालं. त्यांनी १६४ आमदारांचं बहुमत मिळवलं आहे. ९९ मतं महाविकास आघाडीच्या बाजूने होती. नवीन अध्यक्षांची निवड झाली आहे. पूर्ण सभागृहाचा निर्णय हा न्यायालयीन पुनरावलोकनाचा विषय असू शकत नाही. घटनात्मक रित्या निवडून आलेल्या अध्यक्षांना निर्णय घेऊ द्या असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला.

सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रेबाबत सुनावणी सुरू होती. शिवसेनेकडून कपिल सिब्बल यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं. सरन्यायाधीशाच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या प्रकरणांची सुनावणी केली. राज्यपालांच्या बाजूने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. एकनाथ शिंदे यांच्या वतीने हरिष साळवे युक्तिवाद करत होते. सुप्रीम कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि गुरूवारी सकाळी सुनावणी घेऊ असं स्पष्ट केलं.

कपिल सिब्बल यांनी पहिल्यांदा युक्तिवाद सुरू केला

CJI : दोन्ही बाजूंनी या प्रकरणाशी संबंधित असलेले कायदेशीर प्रश्नांचे मुद्दे अर्थात Questions Of Law दिले आहेत का?

हे वाचलं का?

    follow whatsapp