Maharashtra kesari 2022 : कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील ठरला ‘महाराष्ट्र केसरी’
-इम्तियाज मुजावर, सातारा साताऱ्यात रंगलेल्या ६४व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतून नवा महाराष्ट्र केसरी मिळाला. अटीतटीच्या लढतीत कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटीलने विशाल बनकरला लोळवत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. अखेरच्या काही फेरीत पृथ्वीराजने चपळपणे खेळत करत प्रतिस्पर्धी पैलवानाचा पराभव केला. विशाल बनकर बनकर उप महाराष्ट्र केसरी ठरला. सातारा जिल्हा तालीम संघाच्या वतीने शाहू स्टेडिअमवर ६४व्या राज्य महाराष्ट्र […]
ADVERTISEMENT

-इम्तियाज मुजावर, सातारा
साताऱ्यात रंगलेल्या ६४व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतून नवा महाराष्ट्र केसरी मिळाला. अटीतटीच्या लढतीत कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटीलने विशाल बनकरला लोळवत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. अखेरच्या काही फेरीत पृथ्वीराजने चपळपणे खेळत करत प्रतिस्पर्धी पैलवानाचा पराभव केला. विशाल बनकर बनकर उप महाराष्ट्र केसरी ठरला.
सातारा जिल्हा तालीम संघाच्या वतीने शाहू स्टेडिअमवर ६४व्या राज्य महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील आणि सोलापूर जिल्ह्यातील असलेला मात्र पूर्व मुंबईचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या विशाल बनकर यांच्यात जबरदस्त झुंज बघायला मिळाली.
किताब पटकावण्यासाठी पृथ्वीराज पाटील आणि विशाल बनकर यांनी सुरूवातीपासूनच आक्रमक खेळ केला. पहिल्या फेरीत विशाल बनकरने पृथ्वीराज पाटीलला लोळवत एकदम चार गुणांची कमाई केली. विशाल बनकरने आघाडी घेतल्यानंतर पृथ्वीराज पाटीलनंही आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलं. दरम्यान, स्टेपआऊटमुळे पृथ्वीराजला एक गुण मिळाला. त्यामुळे पहिल्या फेरीच्या अखेरीस विशाल बनकरने ४-१ अशी आघाडी घेतली.