परमबीर सिंग यांच्या निलंबनाबात महाविकास आघाडी सरकार सावध भूमिकेत
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आहेत कुठे हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होतो आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे परमबीर सिंग गेल्या काही दिवसांपासून समोरच आलेले नाहीत. त्यांनी लेटर बॉम्ब टाकून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. दुसरीकडे त्यांनी अर्ज केलेली रजा संपून 30 दिवस पूर्ण झाले आहेत त्यानंतर मेडिकल […]
ADVERTISEMENT

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आहेत कुठे हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होतो आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे परमबीर सिंग गेल्या काही दिवसांपासून समोरच आलेले नाहीत. त्यांनी लेटर बॉम्ब टाकून अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले. त्यानंतर एकच खळबळ उडाली. दुसरीकडे त्यांनी अर्ज केलेली रजा संपून 30 दिवस पूर्ण झाले आहेत त्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट देखील परमबीर सिंग यांनी दिलेले नाही. त्यामुळे परमवीर सिंग यांना मेडिकल बोर्ड समोर हजर राहावे लागण्याची शक्यता आहे.एकूणच सर्व कायदेशीर बाबी तपासून नंतर सरकार निलंबनाची प्रक्रिया करणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान मुंबईचे माजी पोलीस आयुक्त देश सोडून गेले आहेत अशा बातम्या येऊ लागल्या आहेत. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की आम्ही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाशी चर्चा करतो आहोत. परमबीर सिंग हे कुठे आहेत त्याचा शोध सुरू आहे. ते एक सरकारी अधिकारी आहेत त्यांना देश सोडून जायचं असेल तर त्यांना रितसर परवानगी काढावी लागणार आहे. तरीही ते संमती न घेता गेले असतील तर ही बाब चांगली नाही. महाराष्ट्र सरकार त्यांचा शोध घेत आहे.
त्यांच्यावर डिपार्टमेंटकडून कारवाई केली जाणार आहे. अनिल देशमुखांवर आरोप केल्यानंतर त्यांच्याबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची उत्तरं सरकारला परमबीर सिंग यांच्याकडून हवी आहेत. सरकार नियमांनुसार जी कारवाई आहे ती करतं आहे असंही दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.