धक्कादायक ! दारु प्यायला २० रुपये न दिल्यामुळे बारामतीत भाजीविक्रेत्याचा खून

माथेफिरु आरोपीला पोलिसांनी केली अटक
धक्कादायक ! दारु प्यायला २० रुपये न दिल्यामुळे बारामतीत भाजीविक्रेत्याचा खून
फोटो सौजन्य: India Today

दारु पिण्यासाठी २० रुपये न दिल्याच्या रागातून बारामतीत एका माथेफिरुने भाजीवाल्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला तात्काळ अटक केली असून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

फारुख तांबोळी असं या घटनेत मृत पावलेल्या भाजीवाल्याचं नाव आहे. या प्रकरणी बारामती पोलिसांनी अनिकेत शिंदे या २२ वर्षीय माथेफिरु तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फारुख तांबोळी हे बारामती शहर आणि नजिकच्या परिसरात भाजीविक्रीचा व्यवसाय करतात. दोन दिवसांपूर्वी आरोपी अनिकेत शिंदे याने दारू पिण्यासाठी वीस रुपये मागितले होते. आरोपी अनिकेत हा मनोरुग्ण असल्याने तांबोळी यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला.

धक्कादायक ! दारु प्यायला २० रुपये न दिल्यामुळे बारामतीत भाजीविक्रेत्याचा खून
बुलढाणा : इलेक्ट्रॉनिक्स दुकानात दरोडा, चोरट्यांकडून दुकान मालकाची हत्या

केवळ 20 रुपये न दिल्याच्या रागातून आरोपी शिंदे याने तांबोळी यांच्यावर लोखंडी पान्ह्याच्या साहाय्याने हल्ला केला होता. यात त्यांच्या लहान मेंदूला मार लागला. गंभीररीत्या जखमी झाल्याने तांबोळी यांना उपचारासाठी पुण्यात दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर खुन्याचा गुन्हा दाखल करुन त्याला तात्काळ अटक केली आहे.

धक्कादायक ! दारु प्यायला २० रुपये न दिल्यामुळे बारामतीत भाजीविक्रेत्याचा खून
पंढरपूर : पत्नी आणि मुलीचा खून करुन फरार झालेल्या आरोपीला अटक

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in