CM शिंदे झाले ट्रोल : मनोहर म्हैसाळकर यांच्याऐवजी यशवंत मनोहर यांचा फोटो पोस्ट
नागपूर : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचं आज निधन झाले. नागपूरमधील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९० वर्षांचे होते. अभ्यासु वक्ता, भाषा अभ्यासक, सर्जनशील लेखक, संशोधक अशी त्यांची साहित्य क्षेत्रात ओळख होती. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन दोन मुली, जावई, बहीण, भाऊ आणि नातवंडं असा बराच मोठा परिवार आहे. मनोहर म्हैसाळकर […]
ADVERTISEMENT

नागपूर : विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचं आज निधन झाले. नागपूरमधील खासगी रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९० वर्षांचे होते. अभ्यासु वक्ता, भाषा अभ्यासक, सर्जनशील लेखक, संशोधक अशी त्यांची साहित्य क्षेत्रात ओळख होती. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन दोन मुली, जावई, बहीण, भाऊ आणि नातवंडं असा बराच मोठा परिवार आहे.
मनोहर म्हैसाळकर यांचं साहित्यात मोलाचं योगदान :
मनोहर म्हैसाळकर यांनी साहित्य क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. गेल्या १० वर्षापासून ते विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळत होते. वाङ्मयाच्या क्षेत्रात त्यांनी आयुष्यभर मोलाचे योगदान दिले आहे. विदर्भ साहित्य संघ म्हणजे मनोहर म्हैसाळकर असे जणू समीकरणच बनले होते. मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांनी मनोहर म्हैसाळकर यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.
शोक व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले ट्रोल :
दरम्यान, म्हैसाळकर यांच्या निधनाप्रती शोक व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नेटकऱ्यांनी चांगलचं ट्रोल केलं. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर पोस्टमध्ये मनोहर म्हैसाळकर यांना श्रद्धांजली वाहिली मात्र त्यावेळी त्यांनी फोटो यशवंत मनोहर यांचा वापरला. नेटकऱ्यांनी त्यांना या चुकीची कमेंट बॉक्समध्ये कमेंट करुन आठवण करुन दिली. त्यानंतर त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडेलवरुन हे ट्विट डिलीट करण्यात आले. तर मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडेलवर फोटोशिवाय श्रद्धांजली वाहण्यात आली.











