आर्यन खानवर समीर वानखेडेंनी कारवाई केल्यानंतर पत्नी क्रांती रेडकरची प्रतिक्रिया, म्हणाली….
अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग अर्थात NCB ने शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकला. अंमली पदार्थ प्रतिबंधक कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक केली. समीर वानखेडे हे अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. तिने या सगळ्या कारवाईनंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. काय म्हणाली क्रांती रेडकर? […]
ADVERTISEMENT

अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग अर्थात NCB ने शनिवारी संध्याकाळी मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर छापा टाकला. अंमली पदार्थ प्रतिबंधक कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी या प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठ जणांना अटक केली. समीर वानखेडे हे अभिनेत्री क्रांती रेडकरचे पती आहेत. तिने या सगळ्या कारवाईनंतर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाली क्रांती रेडकर?
मी समीर वानखेडे यांची पत्नी आहे याचा मला खूप अभिमान वाटतो. त्यांनी ज्या धडाडीने कारवाई केली त्याचं मला कौतुक वाटतं. समीर हे खूप मेहनती आहेत त्यांनी यापूर्वीही अशी अनेक हाय प्रोफाईल प्रकरणं हाताळली आहेत. हे प्रकरण आता थेट बॉलिवूडशी संबंधित आहे त्यामुळे चर्चा जास्त प्रमाणात होते आहे असंही क्रांतीने म्हटलं आहे. ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत क्रांतीने हे वक्तव्य केलं आहे.
आर्यन खानच्या अटकेनंतर NCB चे ‘सिंघम’ समीर वानखेडे पुन्हा चर्चेत, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीशी आहे खास नातं