भारत माता की जय वंदे मातरम अमर रहे शहीद जवान अमर रहे अशा घोषणांमध्ये आज शहीद जवान सागर रामा धनगर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील तांबोळे बुद्रुक येथील शहीद जवान सागर यांना 31 जानेवारीला मणिपूरमध्ये वीरमरण आलं. आज सकाळी तांबोळीवासींयांनी सागर यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी निरोप दिला. लष्कर व पोलीस प्रशासनाच्या वतीने सागर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेत.
23 वर्षीय सागर धनगर नोव्हेंबर 2017 मध्ये मराठा इन्फन्ट्री बटालियनमध्ये रुजू झाले होते. सध्या मणिपूर याठिकाणी सेवा देत असताना त्यांचा गोळी लागून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी सागर यांना अखेरचा निरोप गावात ठिकठिकाणी आदरांजली देणारे बॅनर लावले होते. फुलांनी सजवलेल्या वाहनातून पगार यांची अखेरची अंत्ययात्रा निघाली अंतयात्रा पंचक्रोशीतील हजारो ग्रामस्थ सहभागी झाले होते
सागर यांचं पार्थिव सकाळी मुंबईहून पार्थिव लष्करी वाहनाने सागर यांच्या मूळगावी तांबोळे येथे आणण्यात आलं. गेल्या 2 महिन्यांच्या काळात चाळीसगाव तालुक्यातील तिसऱ्या जवानाला वीरमरण आले आहे.
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी दोन हात करताना यश दिगंबर देशमुख हे शहीद झाले होते. देशमुख हे चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगावमधील रहिवासी होते. त्यानंतर चाळीसगाव तालुक्यातील वाकडीतील जवान अमित साहेबराव पाटील यांचं अपघाती निधन झालं होतं. त्यांच्या अंगावर बर्फाची लादी पडून ते गंभीर जखमी झाले होते. आता पुन्हा याच तालुक्यातील सागर यांना वीरमरण आले असून, जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.