अंबाजोगाई बलात्कार प्रकरण : एक पोलीस, नायब तहसीलदारासह आठ आरोपी अटकेत

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रोहिदास हातागळे, बीड

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईतील 400 जणांनी बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात पोलिसांनी आता एका पोलीस कर्मचाऱ्यासह सेवानिवृत्त नायब तहसीलदार आणि एका होमगार्डला अटक केली आहे. प्रकरण उघडकीस आल्यापासून पोलीस या प्रकरणातील आरोपींविरुद्ध कारवाई करताना दिसत आहेत. पोलिसांनी तीन व्यक्तींना अटक केल्यानंतर तालुक्यात हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे सहा महिन्यांपासून घराबाहेर राहत असलेल्या एका १७ वर्षीय मुलीवर ४०० पेक्षा अधिक जणांनी बलात्कार केल्याच्या घटनेनं खळबळ उडाली होती. ही घटना समोर आल्यानंतर पोलीसही खडबडून जागे झाले. या प्रकरणात 8 नोव्हेंबर रोजी अंबाजोगाईच्या ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एक एक धक्कादायक बाबी पुढे येवू लागल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बीड : अल्पवयीन मुलीवर बलात्काराचे प्रकरण, सहा महिन्यांत ४०० हून अधिकांनी केले अत्याचार

या प्रकरणात पोलिसांनी दोन महिला दलालांना व मुख्याध्यापकासह इतर सात आरोपींना 17 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यानेही अत्याचार केल्याचं आरोपामध्ये म्हटलेलं होतं. पोलीस कर्मचार्‍याचा समावेश असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने पोलिसांवरच ताशेरे ओढत आरोपीला अटक का होत नाही? असा प्रश्‍न उपस्थितीत केला होता.

ADVERTISEMENT

संतापजनक घटना! बीडमध्ये सख्ख्या आणि चुलत भावाचा अल्पवयीन बहिणीवर शारीरिक अत्याचार

ADVERTISEMENT

न्यायालयाने फटकारल्यानंतर पोलिसांनी गेल्या 24 तासांतच आणखी आठ जणांना अटक केली असून, यामध्ये एक पोलीस कर्मचारी, एक होमगार्ड, लॉज चालक असलेला एक माजी नायब तहसीलदार व इतर एक लॉज चालक, एक लॉजचा मॅनेजरसह अन्य इतरांचा समावेश आहे.

‘नवरा नको वाटतो, तर ये माझ्याजवळ’ म्हणून बापच छळायचा; दोघांनी जेवण देतो म्हणून केला बलात्कार

दरम्यान, या प्रकरणात आजपर्यंत किती आरोपींना अटक करण्यात आली, याबाबत अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ न शकल्याने माहिती मिळू शकली नाही. मात्र याप्रकरणात ४०० पेक्षा अधिक जणांनी अत्याचार केल्याचा आरोप पीडितेकडून करण्यात आलेला असल्याने तपासाचे मोठे आव्हान पोलिसांसमोर दिसत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT