विवाहित महिलेशी अश्लील वागणूक; मनसे कार्यकर्त्यांनी मजनूला दिला चोप
विवाहित महिलेशी अश्लील वर्तणूक करणाऱ्या एका मजूनला मनसे कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात चोप दिल्याची घटना समोर आली आहे. अश्लील वर्तणूक करणाऱा व्यक्ती मुंबईतील चुनाभट्टी परिसरातील असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वसईच्या नायगावमध्ये विवाहित महिलेशी अश्लील वर्तणूक करणाऱ्या एका मजनूला मनसेच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात चोप दिल्याची घटना घडली आहे. मनोज थोरात असं या […]
ADVERTISEMENT

विवाहित महिलेशी अश्लील वर्तणूक करणाऱ्या एका मजूनला मनसे कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात चोप दिल्याची घटना समोर आली आहे. अश्लील वर्तणूक करणाऱा व्यक्ती मुंबईतील चुनाभट्टी परिसरातील असून, या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
वसईच्या नायगावमध्ये विवाहित महिलेशी अश्लील वर्तणूक करणाऱ्या एका मजनूला मनसेच्या कार्यकर्त्यांनी भर रस्त्यात चोप दिल्याची घटना घडली आहे. मनोज थोरात असं या मजनूचं नाव असून तो मुंबईच्या चुनाभट्टी परिसरात राहणारा आहे.
भयंकर! धावत्या ट्रेनमध्ये तरुणीवर बलात्कार; इगतपुरी-कसारादरम्यान घडली घटना
मनोज थोरात याने नायगाव येथे राहणाऱ्या एका विवाहित महिलेला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. महिलेने त्यास नकार दिल्यानंतर तो वेगवेगळ्या पद्धतीने तिला धमकविण्याचा प्रयत्न करीत होता.