Raj Thackeray and Babasaheb Purandare: ‘…तर महाराष्ट्रात तांडव करेन’, तेव्हा राज ठाकरे असं का म्हणाले होते?
मुंबई: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे. खरं पाहिलं तर राज ठाकरे यांची बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. जेव्हा कधीही बाबासाहेब पुरंदरे हे राज ठाकरे यांची आठवण काढत तेव्हा-तेव्हा राज ठाकरे हे विलंब न करता थेट पुणं गाठायचे. एवढंच नव्हे तर राज ठाकरे हे कधीही पुण्यात गेल्यानंतर […]
ADVERTISEMENT

मुंबई: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचं नातं आहे. खरं पाहिलं तर राज ठाकरे यांची बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर नितांत श्रद्धा आहे. जेव्हा कधीही बाबासाहेब पुरंदरे हे राज ठाकरे यांची आठवण काढत तेव्हा-तेव्हा राज ठाकरे हे विलंब न करता थेट पुणं गाठायचे.
एवढंच नव्हे तर राज ठाकरे हे कधीही पुण्यात गेल्यानंतर सर्वप्रथम बाबासाहेब पुरंदरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घ्यायचे. त्यामुळेच जेव्हा बाबासाहेबांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराला महाराष्ट्रातूनच विरोध झाला होता तेव्हा राज ठाकरे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता.
बाबासाहेब पुरंदरे यांना 2015 साली तत्कालीन फडणवीस सरकारने महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केल्यानंतर त्यांना राष्ट्रावादी काँग्रेसने प्रचंड विरोध केला. काही संघटनांनी तर त्यांचा पुरस्कार सोहळाच उधळून लावण्याचा इशारा दिला होता. ज्यानंतर राज ठाकरे अत्यंत आक्रमकपणे निषेध करणाऱ्यांना मनसे स्टाइल इशारा दिलेला.
‘जर बाबासाहेब पुरंदरे यांना हात जरी लागला तरी याद राखा मी महाराष्ट्रात तांडव करेन’, असं राज ठाकरे म्हणाले होते.