Whatsapp कडून यूजर्सला पैसे, फक्त करावं लागेल छोटंसं काम

Whatsapp ने आपलं पेमेंट फीचर जास्तीत जास्त यूजर्सपर्यंत पोहचण्यासाठी आता एक भन्नाट कल्पना शोधून काढली आहे.
Whatsapp कडून यूजर्सला पैसे, फक्त करावं लागेल छोटंसं काम
money is getting on whatsapp you will have to do a little work know easy way to get cashback(प्रातिनिधिक फोटो)

मुंबई: WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला पेमेंटचा पर्याय देखील मिळेल. पण आता व्हॉट्सअॅपवर मेसेजिंगसोबतच तुम्हाला पैसे मिळाले तर? होय... आता या प्लॅटफॉर्मवर यूजर्सला कॅशबॅक मिळत आहे.

वास्तविक, WhatsApp पेमेंट केल्यावर यूजर्सला कॅशबॅक मिळत आहे. अॅप एका व्यवहारावर 35 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. पण ही ऑफर सर्व यूजर्ससाठी नाही, यासाठी काही अटी पूर्ण कराव्या लागतील.

WhatsApp कॅशबॅक कसा मिळवायचा?

WhatsApp पेमेंट्स वापरून पहिला व्यवहार केल्यावर तुम्हाला कॅशबॅक मिळेल. यूजर्स या ऑफरचा तीन वेळा लाभ घेऊ शकतात. यासाठी त्यांना वेगवेगळ्या यूजर्संना तीन वेळा पैसे ट्रान्सफर करावे लागतील. WhatsApp कॅशबॅक मिळवण्यासाठी यूजर्संना काही महत्त्वाच्या अटी देखील पूर्ण कराव्या लागतील.

किती रुपये मिळणार?

व्हॉट्सअॅपची कॅशबॅक ऑफर वेगवेगळ्या यूजर्ससाठी वेगवेगळ्या वेळी उपलब्ध असेल. जेव्हा तुम्हाला कॅशबॅक ऑफर मिळेल तेव्हाच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकाल. जेव्हा तुम्हाला WhatsApp कॅशबॅक ऑफर मिळेल तेव्हा तुम्ही इतर कोणत्याही WhatsApp यूजर्सला पैसे ट्रान्सफर करून 35 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळवू शकता.

किमान मर्यादा नाही

चांगली गोष्ट म्हणजे यासाठी किमान रकमेच्या व्यवहाराची कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच, तुम्ही कोणतीही रक्कम ट्रान्सफर करून कॅशबॅकचा लाभ घेऊ शकता. पण लक्षात ठेवा की, यूजर्संना फक्त तीन वेळा कॅशबॅक मिळेल. तसेच, यूजर्सला पेमेंट केल्यावर तुम्हाला फक्त एकदाच कॅशबॅक मिळेल. म्हणजेच, जास्तीत जास्त तीन वेळा कॅशबॅक मिळविण्यासाठी, तुम्हाला किमान तीन वेगवेगळ्या यूजर्संना पैसे ट्रान्सफर करावे लागणार आहेत.

money is getting on whatsapp you will have to do a little work know easy way to get cashback
'या' चुका अजिबात करु नका... तुमचे WhatsApp अकाउंट कायमचे होईल Block!

'या' अटी कराव्या लागतील पूर्ण

तुम्हाला कॅशबॅकसाठी काही अटी देखील पूर्ण कराव्या लागतील. यूजर्सचे खाते किमान 30 दिवस जुने असणे आवश्यक आहे. पेमेंटसाठी यूजर्संना त्यांचे बँक तपशील WhatsApp शी लिंक करावे लागतील.

तुम्ही ज्याच्याशी पेमेंट कराल तोही व्हॉट्सअॅपवर असावा. एवढेच नाही तर इतर युजर्सनीही व्हॉट्सअॅप पेमेंटवर नोंदणी करावी लागेल. म्हणजेच, पैसे पाठविणारा आणि पैसे स्वीकारणारा असे दोघांचेही WhatsApp पेमेंट खाते सेटअप असले पाहिजे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in