महाराष्ट्रात Corona रूग्णसंख्येत चढउतार सुरूच, दिवसभरात 10 हजारांपेक्षा जास्त रूग्णांना डिस्चार्ज

मुंबई तक

महाराष्ट्रात दिवसभरात 10 हजार 353 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 58 लाख 19 हजार 901 कोरोना बाधित रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.02 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 9 हजार 771 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. 29 जूनला म्हणजेच […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

महाराष्ट्रात दिवसभरात 10 हजार 353 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत एकूण 58 लाख 19 हजार 901 कोरोना बाधित रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 96.02 टक्के इतका झाला आहे. आज राज्यात 9 हजार 771 नव्या रूग्णांचं निदान झालं आहे. 29 जूनला म्हणजेच मंगळवारी ही संख्या 8 हजार 85 होती. कालच्या तुलनेत आज रूग्णसंख्या हजार ते तेराशेने वाढल्याचं दिसून येतं आहे.

दिवसभरात राज्यात 141 कोरोना बाधित रूग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर हा 2.01 टक्के इतका आहे. राज्यातील मृत्यूदर हा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने 2 आणि 2.1 टक्के इतका आहे. तो त्याआधी सरासरी 1.80 ते 1.89 टक्के इतका होता. मात्र या वाढलेल्या मृत्यूदरानेही राज्याची चिंता वाढवली आहे.

महाराष्ट्रात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 16 लाख 37 हजार 950 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 61 हजार 404 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 17 हजार 926 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर 4 हजार 173 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. राज्यात आज घडीला 1 लाख 16 हजार 364 सक्रिय रूग्ण आहेत. आज दिवसभरात 9 हजार 771 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रूग्णांची एकूण संख्या 60 लाख 61 हजार 604 इतकी झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण 141 मृत्यूंपैकी 103 मृत्यू हे मागील 48 तासातील तर 38 मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोव्हिड 19 बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

10 हजारांपेक्षा जास्त रूग्णसंख्या असलेले जिल्हे

मुंबई – 12 हजार 574

ठाणे- 16 हजार 115

पुणे- 17 हजार 407

सांगली- 10 हजार 233

कोल्हापूर- 11 हजार 444

महाराष्ट्रातले पाच जिल्हे अजूनही असे आहेत जिथे 10 हजारांहून जास्त सक्रिय रूग्ण आहेत. एकीकडे तिसऱ्या लाटेचा धोकाही संभवतो आहे. दुसरीकडे ही सक्रिय रूग्णसंख्या कमी करण्याचेही प्रयत्न केले जात आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp