अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा खून करणाऱ्या आईला आणि तिच्या प्रियकराला अटक

सांगलीतल्या आष्टा पोलिसांची कारवाई
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा खून करणाऱ्या आईला आणि तिच्या प्रियकराला अटक

स्वाती चिखलीकर, प्रतिनिधी, सांगली

प्रियकराच्या मदतीने अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना मागच्या आठवड्यात उघडकीस आली होती. याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात संबंधित पत्नी आणि तिच्या प्रियकरावर खुनाचा तसेच प्रेताची विल्हेवाट लावल्या प्रकरणी महिलेच्या पतीने गुन्हा दाखल केला होता.

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा खून करणाऱ्या आईला आणि तिच्या प्रियकराला अटक
जेवण गरम करुन दिलं नाही म्हणून डॉक्टर वहिनीची दिराकडून गोळी झाडून हत्या

या हत्या प्रकरणात मंगळवारी रात्री उशिरा दोन्ही आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक करण्यात आष्टा पोलिसांना यश आले आहे. यामध्ये मृत मुलाची आई प्राची वाजे हिला साकीनाका येथून तर तिचा प्रियकर अमरसिंह पाटील याला आंबोली येथून अटक करण्यात आल्याची माहिती इस्लामपूरचे विभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी दिली आहे. त्यांच्यावर कलम 302 , 201 , 366 , 498 , 177 , 34 सह ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट 75 अन्वये या आरोपींच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास आष्टा पोलीस करत आहेत.

सुशांत वाजेची पत्नी प्राची हिचे बिळाशी येथील अमरसिंह पाटील याच्याशी अनैतिक संबंध होते. 27 जून 2021 रोजी प्राची वाजे ही मुलगा मननला घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेली होती. ती अमरसिंह पाटीलच्या मुंबई येथील घरी वास्तव्यास गेली होती. यावेळी अनैतिक संबंधास अडथळा ठरत असल्याने प्राची आणि अमरसिंह यांनी मननचा शारीरिक छळ सुरू केला होता. त्यानंतर दोघांनी मनन याचा खून करून त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावली.

अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा खून करणाऱ्या आईला आणि तिच्या प्रियकराला अटक
धक्कादायक ! चुगली करुन बदनामी करतो म्हणून मित्रांनीच केला मित्राचा खून

मनन हा मुंबई येथे मयत झाला असताना अमरसिंह पाटील आणि प्राची यांनी बिळाशी ग्रामसेवकांकडे प्रतिज्ञापत्र करुन मनन याचा बिळाशी येथे मृत्यू झाल्याचे खोटी माहिती दिली. मनन याचा मुंबई येथे मृत्यू झाला असताना वाकुर्डे येथे त्याच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करुन प्रेताची विल्हेवाट लावली होती. वाळवा येथे याबाबतचे निनावी पत्र सुशांत वाजे यांना आल्याने संबंधित घटनेची पूर्ण माहिती घेऊन संशयित पत्नी प्राची आणि तिचा प्रियकर अमरसिंह पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला होता . या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून आष्टा पोलीस पुढील तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in