‘दादा हा ‘शो’ नाही, पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा…’; श्रीकांत शिंदेंचं अजित पवारांच्या वर्मावर बोट

मुंबई तक

‘काही लोकांना शो करण्याची सवय आहे’, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. अजित पवारांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिलंय. श्रीकांत शिंदेंनी पहाटेच्या शपथविधीचा दाखला देत हा शोले आहे, असं म्हणत वर्मावर बोट ठेवलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

‘काही लोकांना शो करण्याची सवय आहे’, असं म्हणत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. अजित पवारांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिलंय. श्रीकांत शिंदेंनी पहाटेच्या शपथविधीचा दाखला देत हा शोले आहे, असं म्हणत वर्मावर बोट ठेवलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या गणेशोत्वानिमित्त वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या घरी गणपती दर्शनाला जाताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत माध्यमांचे कॅमेरे असतात. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर नामोल्लेख टाळत टीका केली.

अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेला श्रीकांत शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. श्रीकांत शिंदेंनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये श्रीकांत शिंदेंनी पहाटेच्या शपथ विधीवरून अजित पवारांना टोला लगावला आहे.

”बारामती काय अजित पवारच्या बापाची आहे का?”, दादा पत्रकारांवरती का भडकले?

श्रीकांत शिंदेंचं अजित पवारांना उत्तर; ट्विटमध्ये काय म्हटलं आहे?

दादा हा ‘शो’ नाही,

पहाटेच्या फ्लॉप ‘शो’सारखा…

हा ‘शो’ले आहे,

एव्हरग्रीन ब्लॉकबस्टरसारखा !

आणि हो …

हिंदुत्वाचे तेज आणि विकास कामांच्या ‘ट्रेलर’नेच धडकी भरली?

… पिक्चर अभी बाकी है’ !!!

अजित पवार नक्की काय म्हणाले होते?

अजित पवार यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं होतं. “आपल्याकडे गणेशोत्सव (Ganeshotsav 2022) हा वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. आधी नेतेमंडळी एकमेकांकडे एवढ्या मोठ्या संख्येनं गणपतीच्या दर्शनाला जात नव्हते. सध्या जावं लागतं आहे. आम्हीही गणपतीच्या दर्शनाला जातो, मात्र मीडियाचे कॅमेरे सोबत घेऊन जात नाहीत. काही लोकांना शो करण्याची सवय आहे. पूर्वी राज कपूर शो मॅन होते, तसे काही शो मॅन आता झाले आहेत”, असं म्हणत अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका केली होती.

CM शिंदे आमदार जोरगेवारांना रात्री दोन वाजता भेटले अन् प्रश्नही मार्गी लावले…

अजित पवार : बाळासाहेब ठाकरेंनीच सांगितलेलं आहे की,…

दसरा मेळाव्यावरून शिवसेना विरुद्ध शिंदे गट असा सुप्त संघर्ष सुरू झालाय. यावर बोलताना अजित पवार म्हणाले होते, “सगळ्यांनाच परवानगी मागण्याचा अधिकार आहे. पण वर्षानुवर्ष सगळी महाराष्ट्रातली जनता बघत होती की शिवसेनेची स्थापना जेव्हापासून झाली, तेव्हापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्याच सभा तिथे व्हायच्या. बाळासाहेब ठाकरेंनी शेवटी त्याच शिवाजी पार्कच्या मैदानावर सांगितलं होतं की इथून पुढे ही शिवसेना उद्धव ठाकरे पाहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चालेल. पण त्यानंतर गेल्या २० जूनपासून ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या आहेत त्या सगळ्यांनी पाहिल्या आहेत”, असं अजित पवार यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp