Mumbai Airport : मुंबई विमानतळाचं मुख्यालय मुंबईतच, अदानी ग्रुपने केलं स्पष्ट

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईच विमानतळाचं मुख्यालय मुंबईतच राहणार आहे हे स्पष्टीकरण आता थेट अदानी ग्रुपने दिलं आहे. अदानी ग्रुपने मुंबई विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा घेतल्यानंतर मुंबई विमानतळाचं मुख्यालय अहमदाबादला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशा बातम्या येत होत्या. मात्र या बातम्यांमध्ये तथ्य नाही असं म्हणत अदानी ग्रुपने यासंबंधी स्पष्टीकरण दिलं आहे. अदानी ग्रुपने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबतची माहिती दिली आहे.

काय म्हटलं आहे अदानी ग्रुपने?

अदानी ग्रुपकडे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या व्यवस्थापनाचा ताबा आल्यानंतर आम्ही मुख्यालय मुंबईहून गुजरातच्या अहमदाबादमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला अशा काही अपेक्षा आहेत. मात्र असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मुंबईमधून कोणतंही मुख्यालय हलवण्यात आलेलं नाही. MIAL आणि NMIAL एअरपोर्ट ची मुख्यालयं तिथेच राहणार आहे. मुंबईचा आम्हाला अभिमान आहे. तसंच रोजगाराच्या हजारो संधीही उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असंही आवाहन अदानी ग्रुपतर्फे करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अदानी ग्रुपकडे गुवाहाटी, लखनौ, अहमदाबाद, मंगळुरू, जयपूर, तिरूअनंतपुरम विमानतळ व्यवस्थापन ताबा आहे. जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ, तिरूअनंतपुरम त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि गुवाहाटीमधील लोकप्रिय गोपीनाथ बोर्डोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळांची देखभाल करण्याचे हक्कही अदानी समूहाला देण्यात आले आहेत.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा जीव्हीके कंपनीकडून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व्यवस्थापनाचा ताबा आता जीव्हीके कंपनीकडून अदानी समूहाने घेतला आहे. याबाबतचं निवेदन कंपनीने प्रसिद्ध केलं आहे. जीव्हीके आणि अदानीमधील कराराला भारतीय विमानतळ प्राधिकरणाने हिरवा कंदिल दिला होता. इतर खात्यांकडून अद्याप यासाठी मंजुरी मिळणं बाकी होतं. आता त्याला मंजुरी मिळाल्याने व्यवस्थापनाचा ताबा घेण्यात आला. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये अदानी समूहाने जीव्हीके ग्रुपसोबत करार केला होता. त्यानुसार जीव्हीकेच्या नावे 50.5 टक्के वाटा अदानी समूहाच्या नावे करण्यात येण्याचं निश्चित झालं होतं. त्याप्रमाणे कंपनीने मुंबई विमानतळामध्ये वाटा असणाऱ्या दोन दक्षिण अफ्रिकन कंपन्यांशी करार करून त्यांच्याकडी 23.5 टक्के आपल्या नावावार करण्याचा करार केला होता. 13 जुलैला अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडनं जीव्हीके ग्रुपकडून व्यवस्थापनाचा ताबा घेतला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT