Mumbai Mayor किशोरी पेडणेकर ग्लोबल रूग्णालयात दाखल

मुस्तफा शेख

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना ग्लोबल रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना छातीत दुखण्याचा त्रास होत असल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही वेळापूर्वीच किशोरी पेडणेकर यांनी विक्रोळी आणि चेंबूर येथील दुर्घटनांविषयी प्रतिक्रिया दिली होती. आता त्यांना मुंबईतल्या ग्लोबल रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना पोटदुखीचाही त्रास होतो आहे असंही रूग्णालयाने सांगितलं आहे. मुंबईत घडलेल्या […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना ग्लोबल रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना छातीत दुखण्याचा त्रास होत असल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही वेळापूर्वीच किशोरी पेडणेकर यांनी विक्रोळी आणि चेंबूर येथील दुर्घटनांविषयी प्रतिक्रिया दिली होती. आता त्यांना मुंबईतल्या ग्लोबल रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना पोटदुखीचाही त्रास होतो आहे असंही रूग्णालयाने सांगितलं आहे. मुंबईत घडलेल्या दोन्ही घटना दुर्दैवी आहेत असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. आता किशोरी पेडणेकर यांना ग्लोबल रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना छातीत दुखू लागल्याने आणि पोटात दुखू लागल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. मुंबईत मुसळधार पावसामुळे चेंबूरमध्ये दुर्दैवी दुर्घटना घडली. रात्री आपल्याला घटनास्थळी जाता आलं नाही, असं सांगत त्यांनी मृतांबद्दल दुःख व्यक्त केलं होतं. दरम्यान, किशोरी पेडणेकर यांना ग्लोबल रुग्णालयात दाखल करताच तातडीने विविध चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांचं एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. मात्र त्यांना कधीपर्यंत डिस्चार्ज मिळेल याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत, किशोरी पेडणेकर यांना लवकर बरे वाटावे, अशी सदिच्छा व्यक्त केली आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp