Navneet Rana : नवनीत राणांचा गंभीर आरोप; मुंबई पोलीस आयुक्तांनी ‘व्हिडीओ’च दाखवला

मुंबई तक

खासदार नवनीत राणा यांनी खार पोलिसांकडून अटक केल्यानंतर मागासवर्गीय असल्यानं हीन वागणूक दिल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी मागासवर्गीय असल्यानं पाणीही दिलं नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. याची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओ खळबळ उडाली आहे. नवनीत राणा यांनी अटक झाल्यानंत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून मुंबई पोलिसांवर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

खासदार नवनीत राणा यांनी खार पोलिसांकडून अटक केल्यानंतर मागासवर्गीय असल्यानं हीन वागणूक दिल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी मागासवर्गीय असल्यानं पाणीही दिलं नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं. याची लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार केल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओ खळबळ उडाली आहे.

नवनीत राणा यांनी अटक झाल्यानंत लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. त्यांचा हा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही उचलून धरला होता. त्यामुळे बरेच प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, आता मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी व्हिडीओ शेअर केला आहे.

पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मंगळवारी दुपारी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात नवनीत राणा आणि रवी राणा हे पोलीस ठाण्यात बसलेले असून, त्यांच्या समोरच्या टेबलवर पाण्याच्या बॉटल्स आणि चहा आहे. दोघंही स्वतःच्या हाताने साखर घेऊन चहा घेताना या व्हिडीओत दिसत आहे.

लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात नवनीत राणा यांनी काय म्हटलेलं आहे?

हे वाचलं का?

    follow whatsapp