Mumbai Unlock : मुंबईतली मंदिरंही 7 ऑक्टोबरपासून होणार खुली; BMC ने जाहीर केली नियमावली

मुंबई तक

मुंबईतली मंदिरंही नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे महाराष्ट्रातली मंदिरं बंद होती. महाराष्ट्रात मंदिरं सुरू केली जाणार आहेत. आता मुंबईतही मंदिरं सुरू केली जाणार आहेत. त्यासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळं एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास संमती देण्यात आली आहे. […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबईतली मंदिरंही नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे महाराष्ट्रातली मंदिरं बंद होती. महाराष्ट्रात मंदिरं सुरू केली जाणार आहेत. आता मुंबईतही मंदिरं सुरू केली जाणार आहेत. त्यासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळं एकूण क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास संमती देण्यात आली आहे. याआधी राज्यातली मंदिरं आणि सगळी धार्मिक स्थळं सुरू करण्याचा निर्णय झाला आहे.

राज्यात मंदिरं सुरु करण्याचा निर्णय घेतल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

कोरोनच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता तिसऱ्या संभाव्य कोरोनाच्या लाटेशी लढण्याचे नियोजन आपण केलं आहे. हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत आपण निर्बंध शिथील करत आहोत. सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येत उतार येत असला तरीही आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल. धार्मिक स्थळं भक्तांसाठी खुली केली असती तरी त्या ठिकाणी आरोग्याच्या नियमांचं पालन झालं पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशक वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये असंही सरकारने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp