Rain Updates : मुंबईसह राज्यात आज-उद्या मुसळधार; हवामान विभागाचा इशारा

Mumbai Weather updates : पश्चिम महाराष्ट्र वगळता मुंबई, नागपूर, नाशिकसह सर्व राज्याला 'यलो अलर्ट'
Rain Updates : मुंबईसह राज्यात आज-उद्या मुसळधार; हवामान विभागाचा इशारा
पुणे, नाशिकसह संपूर्ण विदर्भाला यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.इंडिया टुडे

राज्यात आज आणि उद्या मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र वगळता मुंबई, नागपूर, नाशिकसह सर्व राज्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून, याचा परिणाम महाराष्ट्रासह इतर राज्यातील हवामानावर झालेला दिसून येत आहे. राज्याच्या विविध भागात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला आहे. आज आणि उद्याही पावसाची संततधार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यात आज पश्चिम महाराष्ट्र वगळता सर्वत्र गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असून, यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उद्या कसा असेल पाऊस?

राज्याच्या काही भागात उद्याही पावसाचा जोर कायम असेल. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, लातूर, हिंगोली अमरावती या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून, यलो अलर्टही जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे महाराष्ट्रासह इतरही राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. मंगळवारी गुजरातच्या अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, अंदमान-निकोबार, आसाम, मेघालय, सौराष्ट्र, कच्छ, तेलंगणा, तामीळनाडू, पुद्दुचेरी आदी भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी लागेल.

विविध राज्यांत पावसाचा जोर वाढणार असून, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, रायलसीमा, केरळ आदी भागांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Related Stories

No stories found.