धक्कादायक! नागपूरमध्ये महिलेची हत्या, प्लास्टिकच्या पिशवीत आढळला मृतदेह

पोलीस या प्रकरणी आता पुढील तपास करत आहेत
धक्कादायक! नागपूरमध्ये महिलेची हत्या, प्लास्टिकच्या पिशवीत आढळला मृतदेह

योगेश पांडे, प्रतिनिधी नागपूर

नागपूरच्या कपिल नगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या उप्पलवाडी या ठिकाणच्या जंगलात एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह पोलिसांना प्लास्टिकच्या पिशवीत असल्याचं निदर्शनास आलं आहे. दीपा जुगल दास (वय-35) असं मृत महिलेचं नाव आहे. या महिलेचा खून करून तिचा मृतदेह मारेकऱ्यांनी प्लास्टिकच्या पिशवीतून जंगलात फेकल्याचं समोर आलं आहे. पोलीस या प्रकरणी आता पुढील तपास करत आहेत.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील जैन इंटरनॅशनल शाळेच्या स्कूल बस वर दीपा दास ही महिला मदतनीस म्हणून कामाला होती. ही शाळा नागपूर शहरालगत असलेल्या फेटरी परिसरामध्ये आहे. बसमध्ये दीपा सकाळी सात वाजता निघायची आणि दुपारी तीन वाजेपर्यंत ती घरी येत असे. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी ती घरून निघाली परंतु नंतर ती घरी परतलीच नाही.परिवारातील सदस्यांनी शोधाशोध केल्यानंतर तिच्या पतीने कपिल नगर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

त्यानंतर पोलिसांना एका मोकळ्या जागेमध्ये महिलेचा मृतदेह पडला असल्याची माहिती मिळाली त्यानंतर नागपूर पोलीस आणि फॉरेन्सिक विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली. प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे,त्यानूसार महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला, नंतर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तो मृतदेह मोकळ्या जागेवर टाकून देण्यात आला. पोलीस आरोपीचा शोध घेत असून पुढील कारवाई सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in