Ajit Pawar Exclusive: 'दाऊदशी संबंध, लवासा हे आरोप झालेच..', अजित पवार असं का म्हणाले?

साहिल जोशी

Ajit Pawar vs Sharad Pawar: अजित पवार यांनी मुंबई Tak ला दिलेल्या मुलाखतीत लवासा आणि दाऊदशी संबंध याबाबत एक विधान केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

ADVERTISEMENT

'दाऊदशी संबंध, लवासा हे आरोप झालेच..', अजित पवार असं का म्हणाले?
'दाऊदशी संबंध, लवासा हे आरोप झालेच..', अजित पवार असं का म्हणाले?
social share
google news

Ajit Pawar: बारामती: लोकसभा निवडणूक 2024 च्या रणसंग्रामात बारामती हा मतदारसंघ अत्यंत चुरशीचा ठरत आहेत. याच निमित्ताने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई Tak ला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी लवासाचे आरोप, दाऊदशी संबधाचे आरोप.. यावरून भाष्य केलं. पण त्यांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (ajit pawar exclusive interview relationship with dawood lavasa is just an allegation why did ajit pawar say that) 

'लवासाचा आरोप झाला ना.. झालाय की नाही? कोर्टात प्रकरण चालू आहे की नाही? त्याला आम्ही जबाबदार आहोत का? दाऊदशी संबंध.. हे आरोप झाले.. संबंध नाहीएत. अजिबात नाहीए.. पण आरोप झाले ना.. केव्हा आरोप होतात.. तुम्ही त्या पदावर काम करत असाल तर आरोप होतात.' असं विधान अजित पवार यांनी मुंबई Tak शी बोलताना केलं आहे. 

जाणून घ्या अजित पवार नेमकं काय म्हणाले

अजित पवारांचं क्रिकेटचं नॉलेज हे भरपूर आहे.. लोकांना वाटतं की, अजित पवारांना राजकारणाच्या बाहेर काही दिसत नाही... असा सवाल अजित पवार यांना मुलाखतीत विचारण्यात आला होता.  

त्यावर अजित पवार म्हणाले की, 'काय झालंय.. आमच्या कानफाट्या नाव पडलंय.. हे काय चिडका आहे.. हा कडक बोलतो.. हा एक घाव दोन तुकडे करतो. ही माझी इमेज सगळ्यांनी करून ठेवली आहे. त्यामध्ये 70 हजार आणि महाराष्ट्र बँकेचा घोटाळा.. एमएससी बँक ही दरवर्षी 600 ते 700 कोटी नफ्यात आहेत. कुठल्याही बँकेचा घोटाळा झाला तर ती बँक रसातळाला जाते..' 

'आज कागदपत्रं झाकली जात नाही.. चेकशिवाय तर बँकेचा व्यवहार होत नाही. कॅशमध्ये तर व्यवहार होत नाही. 50 ठिकाणी चौकशी करा ना..' 

हे वाचलं का?

    follow whatsapp