'महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर...'; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार!
BJP Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : 'महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवादपणे पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांत सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला', असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली.
ADVERTISEMENT
BJP Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : 'महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवादपणे पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षांत सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला', असे म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये दररोज जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, 'आदित्य ठाकरेंना मी मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो असं देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते. तसंच अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचं आश्वासनही मला स्वतः अमित शाहांनी दिलं होतं.' तसंच, 'देवेंद्र फडणवीस जरा जनाची नाही तर मनाची तरी बाळगा', असंही ते म्हणाले होते. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून जोरदार टीका होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रत्युत्तर म्हणून ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष नेमकं काय म्हणाले?
'महाराष्ट्राचा महानालायक कोण? अशी स्पर्धा घेतली तर उद्धव ठाकरे निर्विवाद पहिले येतील. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात सत्तेच्या काळात नालायकपणाचा कळस गाठला होता. पालघर साधू हत्याकांडात ठाकरे मूग गिळून गप्प बसले, 100 कोटी वसुली रॅकेट चालवत कारभार केला. कोरोनामध्ये लोक मरत असताना घोटाळे केले, मृतदेहाच्या बॅगमध्ये मलिदा लाटला. याला कोडगेपणा म्हणतात.' अशा शब्दात बावनकुळेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.
हे वाचलं का?
लोकसभा निवडणुकीनंतर जनता तुम्हाला कायमचं घरी बसवेल- बावनकुळे
'देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतः मुख्यमंत्रिपदावर बसायचं, मुलाला मंत्रिपद द्यायचं आणि बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाला वाऱ्यावर सोडायचं याला कोडगेपणा म्हणतात. लोकसभा निवडणुकीत जनाधार मिळत नसल्यानं उद्धव ठाकरेंनी आता लाज सोडली आहे. आता ते वाटेल तसं बडबडत आहेत.
तुम्ही कितीही शिव्याशाप द्या, देवेंद्रजींसारख्या सच्चा नेत्याला फरक पडणार नाही. पण येत्या लोकसभा निवडणुकीनंतर जनता तुम्हाला मात्र कायमचं घरी बसवेल,' असेही बावनकुळे म्हणाले.
ADVERTISEMENT
'उद्धव ठाकरे भ्रमिष्ट...', फडणवीसांनी दिलं जोरदार प्रत्युत्तर!
'सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट झाले आहेत. त्यामुळेच ते काहीही आरोप करत आहेत. आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करून मी दिल्लीत जाणार असं मी कधीच बोललो नव्हतो. त्यांना वेड लागलं असेल मला तर नाही ना? कालपर्यंत यांना भ्रम होत होता की, अमित शाहांनी त्यांना कोणत्या तरी खोलीत नेऊन तुम्हाला मुख्यमंत्री करतो असं सांगितलं. हा त्यांचा कालपर्यंतचा भ्रम होता. आता त्यांचा भ्रम बदलला. आता म्हणतात, देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं, आदित्यला मुख्यमंत्री करतो.' अशा शब्दात फडणवीसांनी निशाणा साधला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT