Nagaland Firing : नागालँडमध्ये 13 नागरिकांचा मृत्यू का झाला?; समोर आली महत्त्वाची माहिती

मुंबई तक

नागालँडमध्ये सुरक्षा जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात तब्बल 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मोन जिल्ह्यातील ओटींगमध्ये परिसरात ही घटना घडली. त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सुरक्षा दलाची वाहनं पेटवून दिली. या संघर्षात एका जवानाचाही मृत्यू झाला. कोळसा खदानीत काम करणारे कामगार घरी परतत असताना आसाम रायफल्सच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात 13 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नागालँडमध्ये सुरक्षा जवानांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात तब्बल 13 नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. मोन जिल्ह्यातील ओटींगमध्ये परिसरात ही घटना घडली. त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी सुरक्षा दलाची वाहनं पेटवून दिली. या संघर्षात एका जवानाचाही मृत्यू झाला.

कोळसा खदानीत काम करणारे कामगार घरी परतत असताना आसाम रायफल्सच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात 13 नागरिकांचा मृत्यू झाला. या घटनेत एक जवानही शहीद झाला आहे. कामावर गेलेले नागरिक उशिरापर्यंत घरी न परतल्याने गावातील काही लोक त्यांच्या शोध घेत बाहेर पडले. यावेळी त्यांना ओटींगमधील तिरू गावाजवळ नागरिकांचे मृतदेह आढळून आले. नागरिकांचा गोळीबारात मृत्यू झाल्याचं समजल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आसाम रायफल्सच्या जवानांची वाहनं पेटवून दिली.

या घटनेबद्दल आता आसाम रायफल्सने अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं असून, झालेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आसाम रायफल्सने दिलेल्या माहितीप्रमाणे, बंडखोरांचं वास्तव असल्याच्या खात्रीलायक माहितीनुसार त्या परिसरात सुरक्षा जवानांनी शोध अभियान करण्याची योजना तयार करण्यात आली होती. या अभियानादरम्यान ही घटना घडली. झालेल्या घटनेबद्दल आणि त्याच्या परिणामाबद्दल आसाम रायफल्सने दुःख व्यक्त केलं आहे. या घटनेत जवानही जखमी झाले असून, एका जवानाचा मृत्यू झाल्याचं आसाम रायफल्सने म्हटलं आहे.

नागालँडचे मुख्यमंत्री नेफी रिओ यांनी लोकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. त्याचबरोबर या घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. मुख्यमंत्री नेफी रिओ यांनी ट्विट करुन म्हटलं आहे की, ‘मोनमधील ओटींगमध्ये नागरिकांच्या हत्येची घटना दुर्दैवी असून, अत्यंत निंदनीय आहे. मी शोक संतप्त कुटुंबायाप्रती सहवेदना व्यक्त करतो आणि जखमी असलेल्यांची प्रकृती लवकर बरी व्हावी अशी प्रार्थना करतो. उच्चस्तरीय एसआयटी या घटनेची चौकशी करेल आणि देशात असलेल्या कायद्याप्रमाणे न्याय करेल. मी सर्वांनाच शांतता राखण्याचं आवाहन करतो.’

गृहमंत्री अमित शाह यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे. ‘नागालँडमधील ओटींगमधील दुर्दैवी घटनेबद्दल दुःखी आहे. या घटनेत ज्यांनी जीव गमावला त्यांच्यासोबत माझ्या सहवेदना आहेत. शोक संतप्त कुटुंबियांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकारकडून नेमण्यात आलेली एसआयटी या घटनेची चौकशी करेल, असं शाह यांनी ट्विट करून म्हटलं आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp