नांदेड : धुळवडीच्या दिवशी गोळीबार करणाऱ्या चौघांना अटक

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, पूर्ववैमनस्यातून गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज
नांदेड : धुळवडीच्या दिवशी गोळीबार करणाऱ्या चौघांना अटक

नांदेड शहरात धुळवडीच्या सणाच्या वेळी माळटेकडी उड्डाणपुलाच्या समोर दिपक बिगानिया या तरुणावर काही तरुणांनी गोळीबार केला होता. या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ माजली होती. या गोळीबार करणाऱ्या तरुणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दिपक बिगानीया या हल्ल्यात गोळी लागल्यामुळे जखमी झाला आहे.

या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्र वेगाने फिरवत चार आरोपींना अटक केली आहे. हे चारही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांना विमानतळ पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं आहे. गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा आढावा घेत आरोपींना पकडण्यासाठी पथकांची स्थापना केली होती.

नांदेड : धुळवडीच्या दिवशी गोळीबार करणाऱ्या चौघांना अटक
क्रुरतेचा कळस ! दोन महिन्याच्या मुलीची आईकडून हत्या, ओव्हनमध्ये मिळाला मृतदेह

प्राथमिक तपासात दिपक बिगानियावर हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचं समोर आलं. मागील दोन दिवसांपासून पोलीस या आरोपींच्या शोधात होते. बोंढार बायपासवर गाडेगाव येथे हे आरोपी लपून बसल्याचं पोलिसांना समजलं. ज्यानंतर या भागात पोलिसांनी छापेमारी केली असता आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतू या चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. इश्वरसिंग गाडीवाले, राधेश्याम कुंडगीर, कुलविंदरसिंह महाजन आणि गणपतीसिंग मठवाले अशी या आरोपींची नाव असून पोलिसांनी चौघांवरही गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in