नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारले; काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करणार, पण…
औरंगाबाद: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना प्रतिआव्हान दिले आहे. ८ जून रोजी सायंकाळी औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या सभेवरून नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यावर पलटवार केला आहे. आम्ही काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करू. परंतु त्याअगोदर तुम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार आहात का? असा प्रश्न देखील राणांनी विचारला आहे. ज्यादिवशी उद्धव ठाकरे मातोश्रीवरती हनुमान चालीसा […]
ADVERTISEMENT

औरंगाबाद: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना प्रतिआव्हान दिले आहे. ८ जून रोजी सायंकाळी औरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या सभेवरून नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यावर पलटवार केला आहे. आम्ही काश्मीरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करू. परंतु त्याअगोदर तुम्ही मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करणार आहात का? असा प्रश्न देखील राणांनी विचारला आहे.
ज्यादिवशी उद्धव ठाकरे मातोश्रीवरती हनुमान चालीसा पठण करतील त्याच दिवशी मी काश्मिरला जाण्याची तारीख आणि वेळ जाहीर करणार असे म्हणत नवनीत राणांनी मुख्यमंत्र्यांचे आव्हान स्वीकारले आहे. मुख्यमंत्री केवळ सभेमध्ये विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देतात. विकासावर बोलत नाही अशी टीका देखील केली राणांनी केली आहे.
दरम्यान ८ जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. त्यासभेत मुख्यमंत्र्यांनी हिम्मत असेल तर काश्मिरमध्ये जाऊन हनुमान चालीसा पठण करा असे आव्हान दिले होते. तेच आव्हान नवनीत राणांनी स्वीकारले आहे. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री आणि राणा दाम्पत्य संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा घाट घातला होता. त्यावेळी सबंध महाराष्ट्रातून आलेला शिवसैनिक मातोश्री बाहेर ठाण मांडून बसला होता. त्यावेळी राणा दाम्पत्य आणि शिवसैनिक यांच्या प्रचंड मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. प्रचंड ड्रामानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली खार पोलिसांनी अटक केली. आता त्याच मुद्द्यावरुन पुन्हा नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचले आहे.