Nawab Malik: ‘अंत्य संस्कारासाठी मुस्लिम, सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू?’, मलिकांचा वानखेडेंवर पुन्हा निशाणा
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB)झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी थोड्या वेळापूर्वीच ट्विट केलं असून त्यामध्ये त्यांनी समीर वानखेडे यांच्या आईच्या मृत्यू दाखल्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यानुसार मलिकांनी दावा केला आहे की, एकाच व्यक्तीच्या दोन […]
ADVERTISEMENT

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB)झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी थोड्या वेळापूर्वीच ट्विट केलं असून त्यामध्ये त्यांनी समीर वानखेडे यांच्या आईच्या मृत्यू दाखल्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यानुसार मलिकांनी दावा केला आहे की, एकाच व्यक्तीच्या दोन वेगवेगळ्या धर्माची नोंद कशी काय करण्यात आली आहे.
‘आणखी एक फर्जिवाडा, अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य आहे दाऊद ज्ञानदेव’ असं ट्वीट करत नवाब मलिक यांनी ट्विटरवर दोन कागदपत्रं शेअर केले आहेत.
एक और फर्जीवाड़ा,
अंतिम संस्कार के लिए मुसलमान और सरकारी दस्तावेज के लिए हिन्दू ?
धन्य है Dawood Dnyandeo pic.twitter.com/uuM58cjfru— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) November 25, 2021
नवाब मलिक यांचा नेमका आरोप काय?
आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणानंतर नवाब मलिक हे सातत्याने समीर वानखेडे यांच्याविरोधात एकामागोमाग एक आरोप करत आहेत. नवाब मलिक यांचा वानखेडेंवर असा आरोप आहे की, समीर वानखेडे हे मूळ मुस्लिम होते. मात्र, सरकारी नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी आपला धर्म बदलला होता. त्यामुळे वानखेडे यांनी घोटाळा करुन सरकारी नोकरी मिळवली आहे. असा मलिक यांचा आरोप आहे.