नवाब मलिक यांना आता 1 हजार कोटीच्या मानहानीच्या दाव्याप्रकरणी द्यावं लागणार उत्तर

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेने नवाब मलिक यांच्याविरोधात केलेल्या एक हजार कोटींच्या मानहानीच्या दाव्यात आता कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यासह सात जणांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी बॉम्बे हायकोर्टाने सहा आठवड्यांची मुदत दिली आहे. वकील अखिलेश चौबे यांनी बँकेच्या वतीने न्यायालयाला हे सांगितलं की 1 ते 4 जुलैच्या दरम्यान मुंबईतल्या अनेक चौकांमध्ये होर्डिंग्ज लावण्यात आले होते. त्यामध्ये निराधारा, धक्कादायक आणि बदनामीकारक विधानं होती. बँकेची प्रतिष्ठा त्यामुळे धोक्यात आणली गेली.

ज्यानंतर नवाब मलिक यांना आणि इतर सात जणांना बँकेने विविध नोटीसा धाडल्या होत्या. या नोटिसांना उत्तर देताना नवाब मलिक यांनी पोस्टर्स लावलेच नाहीत असं म्हटलं होतं आणि बँकेला नोटीस मागे घेण्यास सांगितलं होतं. त्यामुळे मलिक यांनी याबाबत जाहीर माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असं त्यांच्या वकिलांतर्फे सांगण्यात आलं. माझे अशील नवाब मलिक यांच्या वतीने मी सांगू इच्थितो की बँकेने नवाब मलिक यांच्यवर खोटे आरोप लावले आहेत. त्यांना या वादात अकारण अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आहे असाही युक्तिवाद नवाब मलिक यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टात केला. तसंच ज्या होर्डिंगसंदर्भातला मुद्दा उपस्थित केला जातो आहे त्याबाबत माझे अशील नवाब मलिक किंवा त्यांचा पक्ष म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस यांचा काहीही संबंध नाही असंही स्पष्ट करण्यात आलं.

दरम्यान बँकेच्या वतीने हे सांगण्यात आलं आहे की नवाब मलिक आणि इतर सात जणांनी बँकेची प्रतिमा मलीन करण्याच्या उद्देशाने निंदनीय होर्डिंग्ज लावली होती. बँकेच्या प्रतिष्ठेला यामुळे धक्का बसवण्याचा हेतू यामागे स्पष्ट दिसतो आहे. बँकेची प्रतिमा या होर्डिंग्जमधून डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे बँकेच्या कामकाजाला आणि प्रतिष्ठेला धक्का पोहचतो आहे असाही युक्तिवाद करण्यात आला. बँकेतले अधिकारी भ्रष्ट आहेत आणि ठेवी सुरक्षित नाहीत असा आभास या होर्डिंग्जमधून मलिक यांनी निर्माण केला असाही आरोप याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे आता नवाब मलिक यांना याबाबत आपलं उत्तर द्यावं लागणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

ज्या ठिकाणी बदनामीकारक होर्डिंग लावले होते त्याच ठिकाणी होर्डिंग्ज लावून बँकेवर केलेले आरोप मागे घेण्यास मलिक आणि इतरांना ताबडतोब बँकेची संपूर्ण आणि बिनशर्त माफी मागावी आणि बँकेवर केलेले आरोप मागे घेण्याचे निर्देश दिले जावेत, अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. बँकेने नवाब मलिक यांच्याविरोधात एक हजार कोटींचा मानहानीचा दावा केला आहे. आता या प्रकरणी नवाब मलिक काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT