शिवरायांच्या पुतळ्याला हार घालताना NCP आमदार चढले घोड्यावर, सोशल मीडियावर शिवप्रेमींमध्ये नाराजी
हिंगोली जिल्ह्यातील वसमत मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वसमत शहरात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यानिमीत्ताने आयोजित कार्यक्रमात शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना आमदार नवघरे चक्क घोड्यावर चढले. सोशल मीडियावर राजू नवघरेंचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचा […]
ADVERTISEMENT

हिंगोली जिल्ह्यातील वसमत मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. वसमत शहरात आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यानिमीत्ताने आयोजित कार्यक्रमात शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. यावेळी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना आमदार नवघरे चक्क घोड्यावर चढले.
सोशल मीडियावर राजू नवघरेंचा फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वच स्तरातून त्यांचा निषेध व्यक्त करण्यात येतो आहे. संभाजी ब्रिगेडनेही महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा आरोप केला आहे.
सोशल मीडियासह प्रसारमाध्यमांवर आमदार नवघरेंचा फोटो व्हायरल झाल्यानंतर त्यांनी याप्रकरणी तात्काळ माफी मागितली आहे. “महाराजांचा पुतळा उंच आहे. यावर मी चढू शकत नाही, कार्यकर्ते आणि इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मला वर चढवलं. अनेक जणांनी वर चढून महाराजांना पुष्पहार घातला. फक्त व्हिडीओ व्हायरल करताना माझाच करण्यात आला. शिवसेनेचे माजी आमदार जयप्रकाश मुंदडाही वर चढले होते”, असं स्पष्टीकरण नवघरेंनी मीडियाशी बोलताना दिलं आहे.