जिल्हा बँक निवडणूक: मला हद्दपार करण्याचा प्रयत्न, व्याजासकट परतफेड करणार - आमदार शशिकांत शिंदे

शशिकांत शिंदेंच्या प्रतिस्पर्ध्यांची अखेरपर्यंत निवडणूकीतून माघार नाही, साताऱ्याच्या राजकारणात रंगत
जिल्हा बँक निवडणूक: मला हद्दपार करण्याचा प्रयत्न, व्याजासकट परतफेड करणार - आमदार शशिकांत शिंदे

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विधानपरिषद आमदार शशिकांत शिंदे यांच्या उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शेवटपर्यंत धावाधाव करावी लागली. खुद्द शरद पवारांनी शशिकांत शिंदेंसाठी जोर लावूनही प्रतिस्पर्धी उमेदवार रांजणेंनी अर्ज मागे न घेतल्यामुळे शिंदेचा पराभव निश्चीत मानला जात आहे. यावेळी आपल्याला हद्दपार करण्याचा प्रयत्न केला जात असून या सर्व गोष्टींची वेळ आल्यानंतर व्याजासकट परतफेड करेन असा इशारा शशिकांत शिंदेनी विरोधी गटाला दिला आहे.

"ज्यांना मी वाढवले तेच मला हद्दपार करायला निघालेत. मात्र, आता तालुक्यात नवी समीकरणे उदयास येणार हे निश्चित आहे. राष्ट्रवादीचे सर्वजण एकत्र येऊन तालुक्यात वज्रमूठ तयार केली आहे. वेळ आल्यावर व्याजासकट त्यांची परतफेड करणार आहे", असा सूचक इशारा आमदार शशीकांत शिंदे यांनी मानकुमरे व रांजणे यांना दिला.

जिल्हा बँकेची जावळी सोसायटीची निवडणूक ही राजा विरूध्द प्रजा अशीच झाली. त्यामुळेच ही निवडणुक जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात गाजली.

आमदार शिंदे म्हणाले की, "जावळी सोसायटीतून जिल्हा बँकेसाठी निवडणुकीला सामोरे जाताना माझे दैवत शरद पवार साहेब, माझे आधारस्तंभ अजितदादा पवार, तसेच जिल्हयातील नेते रामराजे निंबाळकर, मकरंद पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील आदी सर्वांनी मनापासून माझ्यासाठी प्रयत्न केले. ही वस्तुस्थिती असून सर्वांचा मी आभारी आहे. या सर्वांनी माझ्यासाठी काल रात्री पर्यंत प्रयत्न केले."

जिल्हा बँक निवडणूक: मला हद्दपार करण्याचा प्रयत्न, व्याजासकट परतफेड करणार - आमदार शशिकांत शिंदे
सातारा निवडणूक : ...तर नाक कापलं गेलं असतं का?; राष्ट्रवादीच्या नेत्यानं शशिकांत शिंदेना सुनावलं

मात्र हे प्रयत्न निष्फळ ठरल्याची खंतही शिंदेनी बोलून दाखवली. काही दिवसांपूर्वी मी आजारी असल्याने त्या कालावधीत मी थोडा गाफिल राहिलो. म्हणूनच मला निवडणुकीला सामोरे जावे लागले असंही शिंदे म्हणाले. शिवेंद्रराजेंनीही आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्यांना यश आलं नाही असंही शिंदे यांनी बोलून दाखवलं.

जिल्हा बँक निवडणूक: मला हद्दपार करण्याचा प्रयत्न, व्याजासकट परतफेड करणार - आमदार शशिकांत शिंदे
विधानपरिषद निवडणूक : सतेज पाटलांनी अनेकांच्या कळा काढल्या, निकालात परिणाम दिसेल - धनंजय महाडीक

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in