कारबाबत नवा ट्विस्ट; ‘ते’ टेलिग्राम चॅनल तिहार जेलमध्ये बनलं!
नवी दिल्ली: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारबाबत एक नवी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण या संपूर्ण प्रकरणांचं कनेक्शन आता थेट तिहार जेलशी असल्याचं समोर येत आहे. अँटेलियाबाहेर जी संशयित कार सापडली होती ती जैश-उल-हिंदने पार्क केल्याचं सुरुवातीला एका टेलिग्राम पोस्टरच्या माध्यमातून समोर आलं होतं. हेच टेलिग्राम चॅनल राजधानी दिल्लीतील […]
ADVERTISEMENT

नवी दिल्ली: प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ कारबाबत एक नवी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण या संपूर्ण प्रकरणांचं कनेक्शन आता थेट तिहार जेलशी असल्याचं समोर येत आहे.
अँटेलियाबाहेर जी संशयित कार सापडली होती ती जैश-उल-हिंदने पार्क केल्याचं सुरुवातीला एका टेलिग्राम पोस्टरच्या माध्यमातून समोर आलं होतं. हेच टेलिग्राम चॅनल राजधानी दिल्लीतील तिहार जेलमध्ये बनविण्यात आल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. कारण ज्या नंबरवरुन हे पोस्टर आलं होतं तो नंबर सुरक्षा एजन्सींनी ट्रॅक केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
म्हणजेच जैश-उल-हिंद नावाने जे बॅनर सुरुवातीला तयार करण्यात आलं होतं ते तिहारमधूनच तयार झाल्याचं समोर आल्याने या प्रकरणातील गुंता हा अधिकच वाढला आहे.
पहिल्यांदा जैश-उल-हिंदच्या नावे जे पोस्टर समोर आलं होतं त्याबाबत दुसऱ्याच दिवशी जैश-उल-हिंदने हे पोस्टर खोटं असल्याचं म्हटलं होतं. एवढंच नव्हे तर त्यांनी असंही म्हटलं होतं की, आमच्या नावे खोटं टेलिग्राम चॅनल बनविण्यात आलं आहे. याबाबतचं सविस्तर वृत्त हे सर्वात आधी ‘मुंबई तक’ने दिलं होतं