दिलासादायक ! राज्यात आज Omicron चा एकही रुग्ण नाही, Corona बाधितांची संख्या ४० हजारांच्या घरात
ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे देशभरासह राज्यात आरोग्य यंत्रणांसमोरची चिंता आता वाढत चालली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत २० हजारांच्या घरात कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असताना राज्यभरात गेल्या २४ तासांत हा आकडा ४० हजार ९२५ वर पोहचोलेला आहे. आज रुग्णसंख्येत वाढ जरी झालेली असली तरीही कोणालाही ओमिक्रॉनची लागण झालेली नसल्याचं समोर येतंय. काल गुरुवारी राज्यात तब्बल ३६,२६५ […]
ADVERTISEMENT

ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे देशभरासह राज्यात आरोग्य यंत्रणांसमोरची चिंता आता वाढत चालली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत २० हजारांच्या घरात कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असताना राज्यभरात गेल्या २४ तासांत हा आकडा ४० हजार ९२५ वर पोहचोलेला आहे. आज रुग्णसंख्येत वाढ जरी झालेली असली तरीही कोणालाही ओमिक्रॉनची लागण झालेली नसल्याचं समोर येतंय.
काल गुरुवारी राज्यात तब्बल ३६,२६५ नवीन रुग्णांचे निदान झाले तर १३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. कालच्या तुलनेत आज राज्यात मृतांच्या संख्येतही वाढ झाली असून २० रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर २.०७% एवढा आहे.
Mumbai COVID Update : रुग्णसंख्यावाढीचा आलेख चढताच, २४ तासांत शहरात २० हजार ९७१ रुग्णांची नोंद
गेल्या चोवीस तासात देशभरात तब्बल १ लाख १७ हजार ९४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या पाहिली तर आतापर्यंत ३.५२ कोटीहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी ३.४३ कोटी बरे झाले असून ४.८३ लाख जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या साडेतीन लाख लोकांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.