Maharashtra Lockdown : तूर्तास महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही; राजेश टोपेंनी दिला दिलासा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईसह राज्यातील काही भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्यानं पुन्हा निर्बंध कठोर केले जाणार असल्याच्या चर्चेंनं जोर धरला होता. मात्र, सध्या तरी लॉकडाऊन लागू केला जाणार नसल्याचं स्पष्ट करत राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला दिलासा दिला आहे.

ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्यात रुग्णसंख्येचा आलेख उंचावत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाण्याची चर्चा सुरू झाली. लॉकडाऊन केला जाण्याबद्दलही बोललं जात होतं. मात्र, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत.

‘आगामी काळात महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्याची कोणतीही शक्यता नाही. माझी लोकांना विनंती आहे की, गर्दी टाळावी. लोकांनी गर्दी न करता गणेशोत्सव साजरा करावा. साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला जावा’, असं आवाहन राजेश टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘राज्य सरकारने कोरोनासंदर्भात विविध स्वरूपाच्या नियमावली निश्चित केलेल्या आहेत. या नियमावलीचं पालन केलं जावं. सध्या तरी लॉकडाऊनचा विषय नाही. मात्र ज्यादिवशी 7 हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज पडेल; त्यादिवशी लॉकडाऊन किंवा कडक निर्बंध लावावे लागतील, असं आम्ही अगोदरच स्पष्ट केलेलं आहे’, असंही टोपे म्हणाले.

ADVERTISEMENT

अजित पवार काय म्हणाले होते?

ADVERTISEMENT

‘यंदाही सार्वजनिक गणेशोत्सवात गर्दीला आवर घालण्याची आवश्यकता आहे. घरगुती गणेशोत्सवाबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, त्या निर्णयाला सगळ्यांनी पाठिंबा द्यावा. गणेशोत्सवात गर्दी वाढली तर दुसऱ्याच दिवशी कठोर निर्णय घेऊ नागरिकांनी तशी वेळ आणू नये. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी आव्हान करतात. मात्र त्यातून काहीजण राजकारण करतात. त्यातून काहीजण सण साजरे करण्याचा प्रयत्न करतात. हे जे काही आहे ते कुठंतरी थांबलं पाहिजे. पुन्हा तिसरी लाट आल्यावर येरे माझ्या मागल्या करून सगळंच बंद करण्याची वेळ राज्यावर आणू नये एवढीच विनंती आहे’, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते.

केंद्राची भूमिका काय?

केरळमध्ये ओनम साजरी झाल्यानंतर कोरोनाचा उद्रेक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे केंद्र सरकार सर्तक झालं असून, महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने राज्याला काही सूचना केलेल्या आहेत. ज्या भागात कोरोना रुग्णसंख्या जास्त आहे, तिथे रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा सल्ला केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेला आहे. तर गर्दी टाळण्यसाठी राज्य सरकारने स्थानिक स्तरावर निर्बंध लावण्याची सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलेली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT