लस घेतलेल्यांचंही 'ओमिक्रॉन'ने वाढवलं टेन्शन! केंद्राच्या माहितीनंतर तज्ज्ञांचा इशारा

Omicron latest update : देशात आढळून आलेल्या ओमिक्रॉन रुग्णांचा अभ्यास करण्यात आला असून, अभ्यासातील माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
लस घेतलेल्यांचंही 'ओमिक्रॉन'ने वाढवलं टेन्शन! केंद्राच्या माहितीनंतर तज्ज्ञांचा इशारा

भारतात कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या 415 वर जाऊन पोहोचली आहेत. तर साडेतीनशेपेक्षा अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान, ओमिक्रॉनचा संसर्ग झालेल्या 183 रुग्णांचा अभ्यास करण्यात आला असून, याची माहिती केंद्राकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. केंद्राने दिलेल्या माहितीप्रमाणे 183 रुग्णांपैकी 50 टक्के रुग्णांचं पूर्णपणे लसीकरण झालेलं होतं. फक्त लसीकरणाच्या जोरावरच कोरोनाची साथ रोखणं अवघड असल्याचं केंद्रानं ही माहिती देताना म्हटलं आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी रुग्णांबद्दल केलेल्या अभ्यासात आढळून आलेल्या निष्कर्षांची माहिती दिली. या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, एकूण रुग्णांपैकी 18 रुग्णांनी प्रवास केलेलाच नाही. यामुळे ओमिक्रॉनचा विषाणू समुहात असल्याचाच हा संकेत आहेत. ज्या रुग्णांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला. त्यापैकी 87 जणांनी लसीचे दोन्ही डोज घेतलेले होते. तर तीन जण बुस्टर डोज घेतलेले आहेत, असं त्यांनी सांगितलं.

एकून 183 रुग्णांपैकी तीन रुग्ण लस न घेतलेले आहेत, तर दोन जणांनी लसीचा पहिला डोज घेतलेला आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे 73 लोकांनी लसीबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. 16 लोक लस घेण्यास पात्र नसल्याचं समोर आलं.

डॉ. पॉल यांनी दिला इशारा...

या आकडेवारीचा संदर्भ देत कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. व्ही.के. पॉल म्हणाले, 'डेल्टापेक्षा ओमिक्रॉनचा घरांमध्ये संसर्ग होण्याचा धोका जास्त असल्याचं स्पष्ट दिसत आहे. बाहेर मास्क न घालता फिरणारी व्यक्ती संक्रमित होऊन घरी येत असेल, तर स्पष्ट आहे की, ती घरातील सगळ्यांना संक्रमित करणार. ओमिक्रॉनचा हा खूप मोठा धोका आहे, त्यामुळे नागरिकांनी ही गोष्ट नीट समजून घ्यायला हवी.'

'पुढच्या काळात खूप सण-उत्सव येणार आहेत. या काळात ओमिक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरू शकतो. त्यामुळे जबाबदार नागरिक म्हणून मास्क वापरायला हवा. हाथ सॅनिटाईज करायला हवेत आणि गर्दी जाणं टाळायला हवं. विनाकारण प्रवास करणंही टाळावं. या काळात वर्दळीत राहू शकत नाही. सावध राहावं लागणार आहे. आपल्याकडे लस आहे, पण फक्त लस महामारी विरोधा पुरेसा पर्याय नाही. आपल्याला रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन साखळी तोडण्यावर जोर द्यावा लागेल,' असं पॉल म्हणाले.

आयसीएमआरचे डॉ. बलराम भार्गव म्हणाले, 'भारतात अजूनही डेल्टा व्हेरिएंट धोकादायक आहे. त्यामुळे आपल्याला आधीच रणनीती कायम ठेवण्याची गरज आहे. कोविड नियमांचं पालन करण्याची गरज आहे. लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल. भारतात आढळून आलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांना सौम्य लक्षणं आढळून आली आहेत," असं भार्गव म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in