Paytm ने गुंतवणूकदारांचा बाजारच उठवला, पेटीएमच्या शेअर्सचं नेमकं झालं तरी काय?
मुंबई: ब्रोकरेज फर्म Macquarie Securities India ने या महिन्यात Paytm च्या महसुलात घट होण्याच्या अपेक्षेने स्टॉकसाठी 900 रुपयांचे टार्गेट दिले होते. मात्र दोन आठवड्यात पेटीएमचे शेअर हे 900 रुपयांच्या देखील खाली आले आहे. खरं पेटीएमच्या शेअर्समध्ये एवढी पडझड होईल याची कुणीही कल्पना केली नव्हती. पण यामुळे गुंतवणूकदारांचं फारच नुकसान झालं आहे. वास्तविक, पेटीएमचे शेअर्स लिस्टिंग […]
ADVERTISEMENT

मुंबई: ब्रोकरेज फर्म Macquarie Securities India ने या महिन्यात Paytm च्या महसुलात घट होण्याच्या अपेक्षेने स्टॉकसाठी 900 रुपयांचे टार्गेट दिले होते. मात्र दोन आठवड्यात पेटीएमचे शेअर हे 900 रुपयांच्या देखील खाली आले आहे. खरं पेटीएमच्या शेअर्समध्ये एवढी पडझड होईल याची कुणीही कल्पना केली नव्हती. पण यामुळे गुंतवणूकदारांचं फारच नुकसान झालं आहे.
वास्तविक, पेटीएमचे शेअर्स लिस्टिंग झाल्यानंतर Macquarie ने 1200 रुपयांचे लक्ष्य दिले होते. त्यानंतर त्याच महिन्यात ब्रोकरेज फर्मने पुन्हा टार्गेट कमी करून 900 रुपये एवढं दिलं होतं. पण आता सोमवारी बाजार उघडताच पेटीएमचे शेअर 900 रुपयांच्या खाली घसरून 881 रुपयांवर आला. शेअर मार्केट बंद होताना पेटीएमचा शेअर 4.61% टक्क्यांनी घसरून 916 रुपयांवर बंद झाला.
पेटीएम स्टॉक नवीन विक्रमी नीचांकावर
सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचे वर्चस्व राहिले. सोमवारच्या व्यवहाराअंती सेन्सेक्स 1,545 अंकांनी घसरून 57,491 वर बंद झाला. तर निफ्टी 468.05 अंकांनी घसरला आणि 17149 अंकांवर बंद झाला.