राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्याचा अजित पवारांनी मोदींसमोरच घेतला समाचार; कोश्यारींना सुनावलं
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी काँग्रेसला टोला लगावला. पूर्वी प्रकल्पांची भूमिपूजनं होत असत पण लोकार्पण आणि उद्घटनं कधी होतील ठाऊक नसायचं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तर याच मंचावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांची थेट तक्रारच पंतप्रधानांकडे केली आहे.य काही दिवसांपूर्वीच त्यांनी छत्रपती शिवरायांबाबत एक वक्तव्य […]
ADVERTISEMENT

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे उद्घाटन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी काँग्रेसला टोला लगावला. पूर्वी प्रकल्पांची भूमिपूजनं होत असत पण लोकार्पण आणि उद्घटनं कधी होतील ठाऊक नसायचं, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तर याच मंचावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांची थेट तक्रारच पंतप्रधानांकडे केली आहे.य काही दिवसांपूर्वीच त्यांनी छत्रपती शिवरायांबाबत एक वक्तव्य केलं होतं. तसंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंबाबतही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याबाबतच अजित पवार यांनी राज्यपालांचं नाव न घेता थेट तक्रार केली.
काय म्हणाले अजित पवार?
अलिकडे अनेक गोष्टी घडत आहेत. सन्मानीय व्यक्तींकडून अनेक अनावश्यक वक्तव्यं केली जात आहेत. अशी वक्तव्यं महाराष्ट्राला मान्य होणारी नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. राजमाता जिजाऊ यांच्याकडूनच त्यांनी यासंबंधीचे धडे घेतले होते.
बऱ्याच गोष्टी घडत आहेत.मला पंतप्रधान यांना काही गोष्टी लक्षात आणून देयचे आहेत अलीकडे काळात महत्वाच्या पदावर बसलेल्या सन्माननिय व्यक्तीकडून अनावश्यक वक्तव्य होत आहेत.ही वक्तव्यं महाराष्ट्राला आणि कुठल्याही व्यक्तीला पटणारी नाही.मान्य देखील नाही