Petrol-Diesel Price update : सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरवाढीचा झटका!
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल दरवाढीची चर्चा सुरू होती. निवडणुका झाल्यानंतर इंधन दरवाढीच्या झळा सर्वसामान्यांना बसतील, असा अंदाज वर्तवला जात होत. अखेर अंदाज खरा ठरला असून, सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे. देशात बुधवारी (२३ मार्च) पेट्रोल-डिझेलच्या दरात पेट्रोल कंपन्यांकडून दरवाढ करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ८० पैशांची वाढ करण्यात […]
ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेल दरवाढीची चर्चा सुरू होती. निवडणुका झाल्यानंतर इंधन दरवाढीच्या झळा सर्वसामान्यांना बसतील, असा अंदाज वर्तवला जात होत. अखेर अंदाज खरा ठरला असून, सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे.
देशात बुधवारी (२३ मार्च) पेट्रोल-डिझेलच्या दरात पेट्रोल कंपन्यांकडून दरवाढ करण्यात आली. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ८० पैशांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ९७.०१ रुपयांवर तर डिझेल ८८.२७ रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. रशिया-युक्रेन संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडकाच उडाला असून, याचा परिणाम आता भारतातही दिसू लागला आहे. भारतातही तेल वितरक कंपन्यांनी दरवाढ करण्यास सुरूवात केली असून, सलग दुसऱ्या दिवशी इंधनाचे दर वाढवण्यात आले आहेत.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत तर पेट्रोलच्या दराचा भडकाच उडाला आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रति लिटर १११.६७ रुपयांवर जाऊन पोहोचले आहेत. तर डिझेलचेही भाव प्रति लिटर ९५.८५ रुपयांवर गेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशावर मोठा ताण पडणार आहे.
देशातील प्रमुख महानगर असलेल्या कोलकातामध्येही पेट्रोलचे भाव १०६.३४ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. डिझेलही प्रति लिटर ९१.४२ रुपयांवर पोहोचले आहे. चेन्नईतही पेट्रोलच्या दरांनी शंभरी ओलांडली आहे. चेन्नईत पेट्रोल प्रति लिटर १०२.४२ रुपये, तर डिझेल ९२.९५ रुपये प्रति लिटर विकत घ्यावं लागत आहे.